घरमहाराष्ट्रदीपक केसरकरांची शिष्टाई फळाला; मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण सुटले!

दीपक केसरकरांची शिष्टाई फळाला; मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण सुटले!

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचे दिसून आले.

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे तब्बल 17 दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुटले. यादरम्यान मागील दहा दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानात मराठी क्रांती मोर्चाकडून आमरण उपोषण केले जात होते. या उपोषणाच्या दहाव्या दिवशी मंत्री दीपक केसरकरांनी शिष्टाई करत हे उपोषण मागे घ्यायला लावले. (Deepak Kesarkars politeness pays off The hunger strike of the Maratha Kranti Morcha ended)

राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचे दिसून आले. तर 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर 1 सप्टेंबर रोजी लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यामुळे राज्यभर मराठा आंदोलन पेटले होते. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा (मुंबई)च्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. या सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या 10 व्या दिवशी मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यावर चर्चा केली. यावेळी त्यांच्या हस्ते ज्यूस पाजून मागे घेण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्र्यांवर केली सडकून टीका

उपोषणकर्त्यांच्या या होत्या प्रमुख मागण्या

जालना येथील लाठीचार्ज आणि गोळीबार प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा.
मराठा क्रांती मोर्चामधे लाखोचे मोर्चे हजारोवर आणून मराठा मोर्चामधे फूट पाडणाऱ्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपसमितीचे अध्यक्ष पदावरून हकाल पट्टी करावी.
मराठा आरक्षणासाठी पाहिले पाऊल म्हणून जातीनिहाय जनगणना करावी.
जालना येथील उपोषण चालू झाल्यापासून मराठा तीन युवा तरुणांनी केलेल्या आत्महत्येमुळे त्यांच्या घरच्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये व त्यांच्या घरच्या किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी मधे घेण्यात यावे.
2016 पासून मराठा मोर्चे चालू झाल्यापासून जे गुन्हे दाखल झाले ते सरसकट मागे घेण्यात यावेत या मागण्यासाठी हे उपोषण करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा : वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिंडेंविरोधात पुणे न्यायालयात दाखल होणार खटला

दीपक केसरकरांनी दिले आश्वासन

या मागण्या घेऊन आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण चालू होते. उपोषणाचा 10 वा दिवस होता. काल अखेर सरकारने दखल घेतल्यामुळे आणि त्यावर आश्वासन दिल्यामुळे समाजबांधवांच्या विनंतीला मान देऊन अखेर उपोषण स्थगित करण्यात आले आहे. लवकरच संबधित विषयासंदर्भात सविस्तर बैठक मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, व मंत्री मंडळासोबत लावणार असण्याचे देखील शिक्षणमंत्री दिपक भाई केसरकर यांनी सांगितले आहे. त्यावेळी महाड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले हे देखील उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -