घरमहाराष्ट्रमुंबईतील 'या' आगारात आजही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, बेस्ट वाहतूक विस्कळीत

मुंबईतील ‘या’ आगारात आजही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, बेस्ट वाहतूक विस्कळीत

Subscribe

मुंबई – पगारवाढ, बोनस आणि विविध मागण्यांसाठी बेस्टचे कंत्राटी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत. विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी नियमित कामबंद आंदोलन पुकारत आहेत. सांताक्रुज, मसाज आगारानंतर आज मरोळ आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आंदोलन पुकारले आहे.  (BEST Strike)

हेही वाचा – बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आजही संपावर, विविध आगारात कामबंद आंदोलन

- Advertisement -

शनिवारपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. शनिवारी सांताक्रुज आगारातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. तर रविवारी मजास आगारातील कामगारांनी आंदोलन केले. आंदोलनाचे हे लोण प्रतीक्षानगर आणि धारावी आगारातही पसरले. दरम्यान, आज पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असून आज मुंबईतील दिंडोशी, मरोळ, शिवाजीनगर, वरळी आगारात आंदोलन सुरू आहे.

मातेश्वरी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले जोगेश्वरीतील मजास आगार, शीव येथील प्रतीक्षा नगर आगारातील आंदोलन बेस्ट प्रशासनाच्या चर्चेनंतर मागे घेतले. तर, आज हंसा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईतील दिंडोशी, मरोळ, शिवाजीनगर, वरळी या डेपोमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या परिणामी बेस्ट बस वाहतूक विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी बेस्टमध्ये कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत. तसंच, वेळेवर पगार न होणे, बोनस न मिळणे, कामाचे तास वाढवणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. सलग तीन दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले असल्याने मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने खासगी वाहतूक चालकांकडूनही भाववाढ होत आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -