घरमहाराष्ट्रअडीच वर्षात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता नाही; फडणवीसांचं मविआवर टीकास्त्र

अडीच वर्षात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता नाही; फडणवीसांचं मविआवर टीकास्त्र

Subscribe

जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा विदर्भात अनेक प्रकल्पांना, योजनांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. गोसीखुर्द संदर्भात २०१३ ते १४ इथपर्यंत ८४०० हेक्टर ओलीत होतं १८ -१८ मध्ये ते ४७०० झालं आणि आत्ता ते जवळपास लाख पोहचला आहे. त्याकरिता सातत्याने निधी त्या काळात उपलब्ध करून दिला, पण कालबद्ध करून त्यासाठी निधी दिला जात आहे. गोसीखुर्द, लोअर वर्धा, बेमळा असे वीस वर्षापासून जे सगळे प्रकल्प अडकले असतील यात चुलबंद, सतरापूर, लोदासीतापूर, मुखाबर्टी, किरमोरी, सोनापूर, बोरघाट, तळोदी मोकासा, दंडोरा बॅरेज, राजेगाव काटी असा अनेक योजना ज्या अडकल्या होत्या त्यांना चालना देणं, पुढे नेण आणि पूर्ण करण्याचे काम मागील काळात केलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली आहे. यावेळी फडणवीसांनी अडीच वर्षात एकही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही म्हणत मविआ सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

 2.5 वर्षात एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता नाही

6 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर 5 मंत्रिमंडळापुढे प्रस्तावित आहेत. आपण 2.5 वर्षात एकही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही, असा आरोप फडणवीसांनी करत कोरोनात ही मान्यता द्यायला काय हरकत होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

भुजबळांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर इतका आक्षेप का?

समृद्धी महामार्गाला जागा मिळते आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी नाही, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी विचारला. ज्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पण तो तर त्यांनी स्वतःला विचारायला हवा होता. त्यांच्या 2.5 वर्षात एक जागा मिळाली नाही. आता आम्ही जागा शोधल्या आहेत.  ओबीसीसाठी DBT ची योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. वसतिगृह खाजगी व्यक्तीला चालवायला देणार नाही, असं म्हणत भुजबळांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर इतका आक्षेप का? त्यांनी जे सर्व आरोप केले, ते सर्व विजय वडेट्टीवार यांच्यावरील केलेत असही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न 

सरासरी बिल पाठविण्याच्या प्रक्रियेत दुरुस्ती केल्यामुळे वसूली 7952 कोटी रुपयांनी वाढली. 9842 कोटी रुपयांची कामे वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रारंभ करण्यात आली आहेत. 15,625 कोटी रुपये निर्मितीसाठी खर्च होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न राज्य सरकार करते आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाचे अतिशय चांगले काम आम्ही केले. बळीराजा जलसंजीवनी योजना, केंद्र सरकारने मोठी मदत केली, सर्वाधिक प्रकल्प राज्याला मिळाले. केंद्राने मोठा निधी दिला, असंही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

मिहान 49 प्रकल्पांना जमीन देण्यात आली आहे. 80,000 लोकांना आतापर्यंत रोजगार देण्यात आला आहे. नवीन विमानतळ हा मिहानचा महत्वाचा टप्पा, येत्या काळात ते काम सुरू करणार आहोत, अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे.


गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य; विद्यमान मंत्र्यांची चौकशी करा, अजित पवारांची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -