हे ‘पोलिसजीवी सरकार, आम्ही राणेंच्या पाठीशी – फडणवीस

तालिबानींचे राज्य नाही, कायद्याचे राज्य

Devendra fadnavis and narayan rane

मुख्यमंत्री मानाच पद आहे. या पदाविषयी बोलताना संयम बाळगण हे आवश्यक आहे, अस आमच मत आहे. वस्तुतः राज्याचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचे वर्ष विसरतात, हे वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करू सांगितले जाऊ शकते. सरकार जी कारवाई करतेय त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. वासरू मारले म्हणून गाय मारू असे होऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष राणेंच्या त्या वक्तव्याशी पाठीशी नाही. पण भाजप नारायण राणेंच्या पाठीशी उभा राहतोय. ज्या पद्धतीने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. हे पोलिसजीवी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या पक्ष कार्यालयावरील हल्ला सहन केले जाणार नाही. आम्ही हिंसा करत नाही, आम्ही राडेबाज नाही. आम्ही त्यामुळे दबणारे लोक नाही, आम्ही लढणारे लोक आहोत. कारवाई झाली नाही, तर पोलिस आयुक्तलयाबाहेर आंदोलन करू असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra fadnavis backs narayan rane over controvercial slapping statement on uddhav thackeray)

सर्जील उस्मानी महाराष्ट्रात येतो, त्याच्यावर कारवाईची हिंमत नाही. त्याच्यावर कारवाई करताना शेपट्या टाकता. याठिकाणी संपुर्ण पोलिस दल नारायण राणे यांच्या अटकेसाठी निघाला. कायदेच्या भाषेतला हा गुन्हा नाही. पण अटकेसाठी पत्र देणार पोलिस आयुक्त हे स्वतःला छत्रपती समजतात का ? मुसक्या बांधा, हजर करा, कोणत्या कायद्याने अधिकार दिला असा सवाल फडणवीस यांनी केला. पहिल्यांदा जबानी, बाजू, मगच कारवाई असे अपेक्षित आहे. पण सध्या ज्या पद्धतीने पोलिसांचा गैरवापर सुरू आहे.

महाराष्ट्रांच्या पोलिसांबद्दल मला आदर आहे. मी पाच वर्षे काम केले आहे. त्यांची क्षमता मला माहित आहे. निष्पक्ष पोलिस दल म्हणून ख्याती. ज्या पद्धतीने वापर पाहतोय. सरकारने बस म्हटल्यावर लोटांगण घालताहेत. सरकारला खुष करण्यासाठी कारवाई होत असेल तर महाराष्ट्राची प्रतिमा चांगली राहणार नाही. वसुली कांडामुळे महाराष्ट्रातील पोलिसांसाठीची नजर बदलली आहे. अशा परिस्थिती ज्या प्रकारे पोलिसांचा वापर केला जातोय, त्यानुसार पोलिसजिवी सरकार झाले आहे. प्रत्येकवेळी न्यायालयाने चपराक दिल्यावरही, पोलिसांना आपला बदला घ्यायचे उपक्रम करायचे हे योग्य नाही. पोलिसांना सल्ला देऊ इच्छितो, की कायद्याने काम करा. बेकायदेशीर काम करणारे आता कुठे आहेत हे सांगायचे कारण नाही. एकाच गुन्ह्यासाठी तीन ठिकाणी गुन्हे दाखल केले जातात. सर्जील उस्मानीसाठी हीच ताकद दाखवा असेही फडणवीस म्हणाले.


हे ही वाचा – राणे कुटूंब माझ्या वाईटावर उठलयं, म्हणूनच मला सुरक्षा – वरूण सरदेसाई