घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : परिवारवादाच्या मुद्द्यावरून फडणवीसांची गांधी, ठाकरेंवर टीका, म्हणाले...

Devendra Fadnavis : परिवारवादाच्या मुद्द्यावरून फडणवीसांची गांधी, ठाकरेंवर टीका, म्हणाले…

Subscribe

मुंबई : काँग्रेसचा परिवारवाद यावरून कायमच भाजपाच्या नेतेमंडळींकडून टीका करण्यात आली आहे. ज्यामुळे परिवारवाद हा मुद्दा राजकारणात कायमच महत्त्वाचा ठरला आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर म्हणजेच गांधी कुटुंबावर, शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबावर सडकून टीका केली आहे. परिवारातील कोणीही राजकारणात यावे, पण स्वतःच्या हिंमतीवर यावे, असे म्हणत फडणवीसांनी परिवारावादाची भाजपात असलेली व्याख्या स्पष्ट केली आहे. (Devendra Fadnavis criticizes Gandhi, Thackeray Family on issue of familyism)

हेही वाचा… Sanjay Raut : …तर मोदी, शहांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती; राऊतांचा घणाघात

- Advertisement -

आज (ता. 17 मार्च) वरळी येथे ‘काँग्रेस न होती तो क्या होता?’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना परिवारवादाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कोणत्याही राजकीय नेत्याचा मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणतीही व्यक्ती राजकारणात येणे, म्हणजे परिवारवाद होत नाही. राजकीय व्यक्तीच्या मुलाने, मुलीने, नातवंडांनी किंवा कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणात यावे. पण त्यांनी आपल्या बळावर राजकारणात यावे, आपली जहांगीर किंवा हक्क समजून पक्षात येऊ नये. तसेच, कोणत्याही पात्र व्यक्तीला लांब ठेवून फक्त परिवारातील सदस्यांनाच पद देण्यात येते, तेव्हा त्याला परिवारवादी राजकारण बोलले जाते, असे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, काँग्रेस संपण्याचे नेमके कारण काय होते, तर त्यांना वाटायचे की, नेहरूजींच्या घराण्यातील व्यक्तीच काँग्रेसचे प्रतिनिधित्व करू शकतो. आजही हीच स्थिती आहे. आज मल्लिकार्जून खर्गे जरी काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. फक्त राहूल गांधी, सोनिया गांधी किंवा प्रियंका गांधीच निर्णय घेऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुटण्याचेही हेच कारण आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केले आणि नंतर त्यांना वाटले की, आपल्या मुलीने पक्ष सांभाळायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

इतकेच नाही, तर हाच प्रकार शिवसेनेतही आपण बघितला. उद्धव ठाकरेंना वाटते आदित्यला पुढे आणण्याच्या दृष्टीने आपण राजकारण करायला हवे. आदित्यला पुढे आणण्याच्या नादात त्यांनी विचारधारा सोडली आणि बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्याला विरोध केला त्या विचारधारेला त्यांनी स्विकारले. त्यामुळे त्यांच्या पक्षात फूट पडली. परंतू, आता या प्रथेला आळा घालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. यापुढे राजकारण्यांची मुले आपल्या बळावरच राजकारणात दिसतील, असेही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले आहे.

यावेळी मुलाखतीच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस नसती तर काय झाले असते? असे विचारले असता, ते म्हणाले की, काँग्रेस नसती तर भारताचे विभाजन झाले नसते. काँग्रेस नसती तर भारतात दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, आतंकवादाची मालिका झाली नसती. याशिवाय काँग्रेस नसती तर 370 सारख्या ऐतिहासिक चुका झाल्या नसत्या आणि एक सशक्त भारत तयार झाला असता, असा टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये नव्याने आलेल्या या मुद्द्यामुळे हा नवा वाद किती वाढतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -