घरताज्या घडामोडीगोपीचंद पडळकरांच्या जिवाला धोका, विशेष सुरक्षेची मागणी करणारे फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोपीचंद पडळकरांच्या जिवाला धोका, विशेष सुरक्षेची मागणी करणारे फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना विशेष सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी पडळकर यांना सुरक्षा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र पाठवले आहे. गोपीचंद पडळकर यांच्यावर काही महिन्यांपासून हल्ले होत आहेत. ते सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी आहेत. राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन धारेवर धरलं आहे. पडळकरांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र त्यांच्यावर जे हल्ले झालेत त्याची नोंद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. तसेच पडळकर यांच्या जिवाला धोका असल्यामुळे त्यांना तातडीने विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी करणारे पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे पडळकरांवर दुखावलेल्या लोकांकडून सतत हल्ला करण्यात येत आहे. अशा प्रकारे लोकशाहीमध्ये हिंसेने आवाज दाबणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. विरोधक असो किंवा सत्ताधारी जर त्याच्या जिवाला धोका असेल तर त्यांना संरक्षण दिले पाहिजे. यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष सुरक्षा देण्यात यावी, जर पडळकर यांच्या जिवाचे काही बरंवाईट झाले तर त्याची जबाबदारी ही राज्य सरकारवर असेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

- Advertisement -

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर घोंगडी बैठका घेतानाही सोलापूरमध्ये हल्ला झाला होता. यावेळी त्यांच्यावर हल्ला करणारा अज्ञात व्यक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. पडळकर यांच्या गाडीवर मोठी दगड टाकण्यात आली होती. त्या हल्ल्यात पडळकर यांना दुर्दैवाना दुखापत झाली नव्हती. यानंतर पडळकर यांच्यावर सागलीमध्येही हल्ला झाला होता. यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे पडळकर यांना संरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


हेही वाचा : झूठ बोले कौआ काटे, नवाब मलिकांचा भाजप नेते अनिल बोडेंवर ऑडिओ क्लिप शेअर करत निशाणा

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -