११२ डायल करा अन् १० मिनिटांत पोलीस मदत मिळवा

तत्काळ मदतीसाठी नवी हेल्पलाईन

mumbai-police helpline

कोणतीही आपत्ती ओढवली की त्या-त्या विभागांचा क्रमांक आठवून फोन करण्याचा त्रास आता वाचणार आहे. कारण, सरकारच्या नव्या निर्णयानुसार केवळ ११२ हा क्रमांक डायल करुन पोलीस, अग्निशमन अशा तातडीच्या सेवा एकाच ठिकाणी लवकरच उपलब्ध होणार आहेत.

जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून ११२ या एकाच टोल-फ्री हेल्पलाइनवरुन सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचतील, असे नियोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामीण पोलिसांना ६ वाहने देण्यात आले असून, पोलिसांचे प्रशिक्षण सुरू आहे. जिल्ह्यात ४० पोलीस ठाणे, २१८ पोलीस अधिकारी व ३ हजार ४०० पोलीस कर्मचारी आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास संकटात सापडलेल्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर कॉल केल्यास हा कॉल कुठून आला, हे त्या भागातील पोलीस स्टेशनला समजेल. त्यानंतर प्रसंगानुसार पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांनाही एकाचवेळी कॉलची माहिती दिली जाईल व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल होईल.

आपत्कालीन मदतीसाठी शासनाकडून ११२ हेल्पलाईन क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी पहिल्या टप्

S.P. Sachin Patil
S.P. Sachin Patil

प्यात १२० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय १० अशा ५२५ पोलिसांना प्रशिक्षण दिले जाईल. ११२ क्रमांकाची चाचणी घेण्यात तांत्रिक अडचणी येत असून, जुलै महिन्यात ही सेवा सुरू होईल.

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक