घरताज्या घडामोडीदिशा सालियनच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र; राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची केली विनंती

दिशा सालियनच्या कुटुंबीयांचे राष्ट्रपतींना पत्र; राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची केली विनंती

Subscribe

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या दिशाच्या आई-वडिलांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे दिशाच्या कुटुंबीयांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांनी त्याच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, दिशाच्या कुटुंबियांनी फक्त राष्ट्रपतींना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र लिहून मुलीच्या मृत्यूवर सुरू असलेले राजकारण थांबवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिला होता. काही अटी, शर्थींसह नारायण राणे आणि नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी न्यायालयाने मंजूर केला होता. दिशा सालियानचा बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला होता. याविरोधात दिशाच्या आई आणि वडिलांनी राणे पिता-पुत्रांविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Nitesh Rane : कोल्हापुरातील रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -