घरमहाराष्ट्रNitesh Rane : कोल्हापुरातील रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला, नितेश राणेंच्या दाव्याने...

Nitesh Rane : कोल्हापुरातील रुग्णालयात माझ्या हत्येचा कट रचला, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

Subscribe

कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. अचानक डॉक्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे आग्रह केला, नितेशजी तुमची अँजिओ करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मी म्हणालो मला तसं तरी वाटत नाही. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, सीटी अँजिओ करावीच लागेल.

संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना नितेश राणेंची प्रकृती खालावली होती. त्यावेळी त्यांना सिंधुदुर्गातून कोल्हापुरातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेव्हा माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने मला सतर्क केल्यानं मी वाचल्याचोही दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिलीय.

कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. अचानक डॉक्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे आग्रह केला, नितेशजी तुमची अँजिओ करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मी म्हणालो मला तसं तरी वाटत नाही. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, सीटी अँजिओ करावीच लागेल. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने येऊन मला सतर्क केले. नितेशजी सीटी अँजिओ करू नका, त्यानिमित्ताने तुमच्या शरीरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही ते करण्यास परवानगी देऊ नका, असं मला त्याने सांगितलं. विधानसभेत भाजप आमदार नितेश राणेंनी हा दावा केल्यानं एकच खळबळ उडालीय.

- Advertisement -

ईसीजी मशिनमध्ये खोटा रिपोर्ट बनवून वारंवार पोलिसांवर प्रेशर आणलं जात होते, कलानगर परिसरातून वारंवार फोन येत होते की, याला डिस्चार्ज करा, अटक करायची आहे. षडयंत्र रचायचं नाही, तर त्यांच्या शरीरात चुकीची औषधं टाकायची आणि कायमस्वरुपी विषय संपवून टाकायचं असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे हे कणकवली न्यायालयात शरण आले होते. यानंतर न्यायालयाने त्यांची दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर नितेश राणे यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यानच्या काळात नितेश राणे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नितेश राणे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते कोल्हापूरहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले होते.

- Advertisement -

हेही वाचाः Petrol Diesel Price: चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या आजचे दर

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -