घरमहाराष्ट्रराज्यातील कायदा व सुव्यस्थेचा उडाला बोजवारा; दानवेंनी साधला सरकारवर निशाणा

राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा उडाला बोजवारा; दानवेंनी साधला सरकारवर निशाणा

Subscribe

महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिद्ध झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारधारेवर चालणारे राज्य असून मागील कित्येक वर्षांच्या राज्य सरकारच्या कारभारातून सिद्ध झाले आहे. राज्यातील मुलींची बेपत्ता होण्याची वाढती संख्या ही चिंताजनक बाब असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे. ( Disruption of law and order in the state Ambadas Danve have targeted the government )

महाराष्ट्रात रोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर जानेवारी ते मार्च २०२३ या काळात राज्यातून सुमारे ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. जानेवारी २०२३ या महिन्यात १ हजार ६०० मुली तर फेब्रुवारी महिन्यात १ हजार ८१० तर मार्च महिन्यात २ हजार २०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली व महिला यांचे प्रमाण वाढत आहे. सदर बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी चिंताजनक असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

- Advertisement -

आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्या

महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षेसाठी अग्रगण्य असलेले राज्य म्हणून गणले जाते. अशा राज्यात मुलीच महिला सुरक्षित नसतील तर सदर बाब राज्यासाठी चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी योग्य ती पावले उचलून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

शेवगावात दगडफेक

छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या शेवगाव शहरात मिरवणुक काढण्यात आली होती. यादरम्यान दोन गटात दगडफेक झाली होती. या दगडफेकीत परिसरातील दुकानांचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या दगडफेकीत 4 पोलीस जखमी झाले होते.

- Advertisement -
अंबादास दानवेंचं पत्र
अंबादास दानवेंचं पत्र

अकोल्यात दंगल

13 मे शनिवारी रात्री अकोल्यातील हरिहरपेठ भागांत दोन गटात सोशल मीडियाच्या पोस्टवरून वाद झाला आणि या वादाचं रुपांतर दंगलीत झालं. त्यानंतर या भागात कलम 144 लागू करण्यात आलं होतं. या प्रकरणांवरुन आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -