घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमाजी आमदारासह डझनभर नेते शिंदे गटात; ठाकरे गटासह मनसे, राष्ट्रवादीतही पडझड

माजी आमदारासह डझनभर नेते शिंदे गटात; ठाकरे गटासह मनसे, राष्ट्रवादीतही पडझड

Subscribe

नाशिक : उध्दव ठाकरेंंच्या शिवसेनेला शहरात भगदाड पडल्यानंतर ग्रामीण भागातील दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले, सुरेश डोखळे यांच्यासह माजी नगरसेवकांनीही बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाच्या वाढत्या पाठिंब्यामुळे ठाकरे सेना कमकुवत होत चालली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या नाशिकरोड-देवळाली गावातील शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे व छत्रपती सेनेच्या अध्यक्षांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हरिष भडांगे, छत्रपती सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, सुप्रिया कदम, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख लकी ढोकणे यांंच्यासह सामनगावचे नागरिक शिंदे गटात दाखल झाले. यासह मनसेचे विभागध्यक्ष नितिन साळवे, विक्रम कदम, माजी नगरसेविका मेघा साळवे हेही शिंदे गटात दाखल झाले आहेत.

- Advertisement -
यांचा झाला प्रवेश

धनराज महाले यांसह जेष्ठ नेते सुरेश डोखळे, कादवा साखर कारखान्यांचे माजी संचालक संतपराव घडवजे, बाळासाहेब मेंदणे, युवा नेते सचिन बर्डे, किरण कड यांसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंगळवारी (दि.27) रात्री 9.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

महिला आघाडीची पहिली शाखा

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे यांच्या हस्ते नाशिकरोडला पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शाखाप्रमुखपदी उज्वला भालेराव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली दाणी, राधिका मराठे, प्रज्ञा गायकवाड, सुजाता खरे, करुणा धामणे, निता भालेराव, छकुबाई उन्हवणे, सूर्या पिंजारी, रुकसाना शेख, जिजाबाई पगारे, सुगंधा भालेराव, अनिता निकम आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -