घरताज्या घडामोडीसंजय राऊतांची मागणी फेटाळली, ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले

संजय राऊतांची मागणी फेटाळली, ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावले

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी वकिलांमार्फत ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, त्यांची मागणी ईडीने फेटाळून लावली. त्यामुळे २७ जुलै रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ते दिल्लीत असल्याने ईडी चौकशीला जाऊ शकले नाहीत. दरम्यान, आता त्यांना २७ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ED against summons to Sanjay Raut)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी वकिलांमार्फत ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. मात्र, त्यांची मागणी ईडीने फेटाळून लावली. त्यामुळे २७ जुलै रोजी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘नंदनवनात’ घडला किस्सा ‘मंगल जोड्या’चा

काय आहे पत्रा चाळ जमीन घोटाळा?

मुंबईतील गोरेगाव इथे पत्रा चाळ आहे. महाराष्ट्र सरकारने चाळींमध्ये राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना फ्लॅट देण्याची सरकारी योजना आखली, तेव्हा हा घोटाळा सुरू झाला आणि एचडीआयएलची कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने भाडेकरूंसाठी सदनिका बांधण्याचे कंत्राट दिले. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन ३ हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. चाळीतील ४७ एकर जागेवर हे फ्लॅट्स बांधले जाणार होते, पण गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅट्स दिले नाहीत. कंपनीने ४७ एकर जमीन इतर आठ बिल्डर्सना १,०३४ कोटी रुपयांना विकली. या जमीन घोटाळ्यात एचडीआयएल कंपनीने केलेल्या घोटाळ्यांमध्ये प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवान यांचा समावेश आहे. प्रवीण राऊत हा संजय राऊतांचा मित्र असून, ईडीच्या तपासात त्याचे नाव पुढे आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

संजय राऊत यांच्या पत्नीचाही जमीन घोटाळ्यात सहभाग

प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते, ज्याचा वापर संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. या जमीन घोटाळ्यातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचे नावही संजय राऊत यांच्याशी जोडले गेले होते. सुजित हा संजय राऊतांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही पत्रा चाळ जमीन घोटाळ्याच्या पैशातून खरेदी करण्यात आली होती.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -