Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुणे, मुंबई ईडीच्या रडारवर; छापेमारी करत कोट्यवधींची संपत्ती जप्त

पुणे, मुंबई ईडीच्या रडारवर; छापेमारी करत कोट्यवधींची संपत्ती जप्त

Subscribe

मागील अनेक महिन्यांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रातील विविध भागांत मोठी कारवाई केली जात आहे. नुकताच बँकेची फसवणूक प्रकरणात ईडीने महाराष्ट्रातील मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात छापेमारी केली.

मागील अनेक महिन्यांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रातील विविध भागांत मोठी कारवाई केली जात आहे. नुकताच बँकेची फसवणूक प्रकरणात ईडीने महाराष्ट्रातील मुंबई, पनवेल, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात छापेमारी केली. या कारवाईतून ईडीने 6 कोटी 69 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. याबाबत ईडीने ट्विटवरून माहिती दिली. ईडीने यापूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. (ED attaches eight immovable properties worth Rs 6 69 crore situated in Mumbai Panvel Pune Raigad Ratnagiri in Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, मॅग्नम स्टीलचे भाग असलेल्या कुणाल गांधी यांच्यांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यांची एकूण 6.69 कोटी रुपयांची 8 स्थावर मालमत्ता जप्त केली. बँकेच्या कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. त्याच अंधरी येथील फ्लॅट व कार्यालय, पनवेल येथील फ्लॅट, रत्नागिरीत शेत जमीन आदी मालमत्तेचा समावेश आहे. बँक कर्ज फसवणुकीशी संबंधित प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

कुणाल किशोर गांधी आणि किशोर कांतीलाल गांधी हे मॅग्नम स्टीलचे भागीदार आहे. त्यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम त्याच्या इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करून त्यातून 3 तात्पुरत्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यामध्ये अंधेरी, मुंबई येथे असलेले दुकान-कम-कार्यालय, पनवेल येथे स्थित एक सदनिका आणि रत्नागिरी, महाराष्ट्र येथे असलेली शेतजमीन यांचा समावेश आहे. पुणे शहरातही 5.24 कोटी रुपयांची प्रापर्टी त्यांनी खरेदी केली होती.


हेही वाचा – ‘संभाजीनगरमधील दंगलीसाठी समाजसंकटांना खुली सुट; राममंदिर आणि दंगल रोखण्यासाठी फक्त १५ पोलीस’

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -