आमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ, ईडीने कोट्यवधींची मालमत्ता घेतली ताब्यात

ईडीने पीएमएलए कायद्यानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेतले.

ED's major action against MLA Ratnakar Gutte
आमदार रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ, ईडीने कोट्यवधींची मालमत्ता घेतली ताब्यात

गंगाखेडचे विधानसभा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अ़डचणीत वाढ झाली आहे. ईडीने कोट्यावधींची मालमत्ता जप्त करत ताब्यात घेतली आहे. बीड जिल्ह्यातील पोल्ट्रीही जप्त करण्यात आली आहे. गुट्टे यांनी ६३५ कोटी रुपयांची फसवणू केल्या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. या चौकशीमध्ये ईडीकडून २५५ कोटी रुपयांची संपत्ती यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही गुन्हा रत्नाकर गुट्टे यांच्यावर करण्यात आला आहे.

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात कारवाई केली आहे. डिसेंबर २०२० मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुट्टेंनी गरीब शेतकऱ्यांच्या नावावर बँकेकडून कर्ज घेत फसवणूक केली होती. ऊसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना, बियाणे खत आणि ट्रॅक्टर देण्यासाठी कर्ज तसेच शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी कर्ज देण्यात आले होते. अशा प्रकारे गुट्टे यांनी एकूण ६३५ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन भ्रष्टाचार केला आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. गेल्या आठवड्यात ईडीने गंगाखेड शुगर एन्ड एजन्सी मिलची १०० एकर जमीन जप्त जप्त केली आहे. तर आता पोल्ट्री जप्त करण्यात आली आहे. गुट्टे यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावली नाही. ईडीने पीएमएलए कायद्यानुसार मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेतले. त्यानंतर कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातूनच त्यांच्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड या कंपन्यांमध्ये गुंतवली.


हेही वाचा : Corona Virus : किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे आदेश