घरक्राइमEknath Khadse : मोठी बातमी! दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना...

Eknath Khadse : मोठी बातमी! दाऊद, छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास जवळपास चार ते पाच धमकीचे फोन आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकनाथ खडसे यांना बुधवारी सकाळच्या सुमारास जवळपास चार ते पाच धमकीचे फोन आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. (Eknath Khadse Death threat phone call from Dawood Chota Shakeel gang)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. दाऊद, शकील गँगकडून हे धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे विविध देशांतून एकनाथ खडसे यांना धमकीचे फोन आले. चार ते पाच वेगवेगळ्या मोबाईलनंबरवरून जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार करताना दिली.

- Advertisement -

या धमकीनंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मला जवळपास चार ते पाच धमकीचे फोन आले होते. सकाळी मला फोन आले. अमेरिकेतून एक फोन आला होता. तर दुसरा फोन लखनऊमधून आला होता. उर्वरित मोबाईल नंबरचा पोलीस तपास करत आहेत. मला धमकीचा फोन आला तेव्हा मला बोलले की, आम्ही दाऊद, शकील गँगची माणसं आहोत. तुम्हाला जीवे मारण्यात येणार आहे, असे त्या फोनवरून सांगितल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – MAHARASHTRA BHUSHAN ACCIDENT : महाराष्ट्र भूषण सोहळा दुर्घटनेचा ठपका कुणावर? अहवालाचं काय झालं?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -