घरमुंबईMumbai School : मुंबईतील शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Mumbai School : मुंबईतील शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Subscribe

शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत महापालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे.

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत महापालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. ‘आरटीई’अंतर्गत ऑनलाइन प्रवेशाची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्याआधीच पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Mumbai schools Online admission process started under RTE )

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील 1 हजार 383 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 हजार 14 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून 16 एप्रिलपासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… UPSC Result 2023 : युपीएससीच्या निकालावर महाराष्ट्राची मोहर; राज्यातून समीर खोडे प्रथम

यंदा 22 हजार जागांमध्ये वाढ…

आरटीईअंतर्गत मुंबईतील एसएससी बोर्डाच्या 1 हजार 319 तर अन्य 64 अशा मिळून 1 हजार 383 पात्र शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 हजार 14 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये एसएससी बोर्ड 27 हजार 869 तर अन्य 1 हजार 145 जागांचा समावेश आहे. यापूर्वी ही प्रक्रिया फक्त विनाअनुदानीत खासगी शाळांसाठी लागू असायची. मात्र, या वर्षीपासून या प्रक्रियेमध्ये सरकारी शाळा, महापालिकेच्या शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा तब्बल एक हजार शाळांची वाढ झाली आहे. तर जवळपास 20 हजार जागादेखील वाढल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता घरापासून एक किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळेमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

- Advertisement -

आरटीईअंतर्गत दुसऱ्यांदा प्रवेश घेता येणार नाही…

ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी केले आहे.

हेही वाचा… कल्याण लोकसभेसाठी २ हजार मतदान केंद्रे


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -