घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी..., जितेंद्र आव्हाडांचे भाजपावर टीकास्त्र

Lok Sabha 2024 : बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी…, जितेंद्र आव्हाडांचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

भाजपाला 400 जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे. संविधान बदलणे ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भ्रष्टाचारावर भर दिला आहे. तर, भाजपाला राज्यघटना बदलायची आहे, हा मुद्दा विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ने लावून धरला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. (Lok Sabha Elections 2024, Jitendra Awhad criticizes BJP for its alleged role in changing the Constitution)

महाराष्ट्राच्या बीडमधील भाजपा उमेदवार पंकजा मुडे, राजस्थानमधील भाजपा उमेदवार ज्योती मिर्धा, फैजाबाद अयोध्या लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांनी संविधानाबद्दल वक्तव्य केले आहे. भाजपाला संविधानात बदल करायचा असून त्यासाठी संसदेत मोठे बहुमत आवश्यक असल्याचे या सर्वांनी जाहीररीत्या म्हटले आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

- Advertisement -

विरोधा पक्षनेते विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून भाजपावर टीका केली आहे. आता राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. आतापर्यंत भाजपाच्या पाच उमेदवारांनी आपल्या प्रचार करताना, ‘आम्हाला संविधान बदलण्यासाठी जास्त जागांवर विजयी करा,’ असे म्हटले आहे. म्हणजेच, यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे. यांना 400 जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे. आम्हीही तेच म्हणत आहोत. बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी भारताला आजही पाच हजार वर्ष मागे घेऊ जाऊ इच्छितात, असा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आले, नवनीत राणांनी दाखवला मोदींच्या हवेवर अविश्वास

“प्राचीन भारतात घेऊन जाणारा हा सत्ताधारी पक्ष आहे,” असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी एका मुलाखतीत संगितले असून ते बरोबर आहे. भाजपाच्या प्रमुख मंत्र्यांचे पती जेव्हा अशी वक्तव्ये करतात; तेव्हा खासगीत त्यांची पत्नी त्यांना काहीतरी सांगतच असणार ना, असा तर्क देऊन आव्हाड यांनी सांगितले की, यावरून स्पष्ट होते की, संविधान बदलणे ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -