घरमुंबईखडसेंच्या सूचक वक्तव्याने भाजपात खळबळ

खडसेंच्या सूचक वक्तव्याने भाजपात खळबळ

Subscribe

एका पक्षात राहण्याचे दिवस संपले

एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरुपी एका पक्षात राहण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, असं सांगत माजी मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. लेवापाटील समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपला खडेबोल सुनावले. पक्षाकडून होत असलेल्या अवहेलनेला त्यांनी वाचा फोडल्याचे बोलले जात आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या हेतूनेच त्यांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. याच व्यासपीठावर काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसे यांना काँग्रेसमध्ये आपला सन्मान होईल, असे सांगत त्यांना पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले.

मंत्रिपदावरून दूर करण्यात आल्यापासून खडसे यांनी अनेकदा भाजपला खडे बोल सुनावले होते. पक्षानेही त्यांच्या जळगावात आणि शेजारील धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून खडसे यांना दूर ठेवले होते. गेल्या महिन्यात जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक बालाजी लॉन येथे बोलवण्यात आली होती. या बैठकीवेळीही खडसे अनुपस्थितीत होते. लेवा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘अन्याय सहन करता कामा नये, तो होतो तेव्हा वेळीच प्रतिकारदेखील करायला हवा, अन्यथा समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होत नाही’, असे म्हटले. खडसे यांचे हे वक्तव्य म्हणजे पक्ष सोडण्याबाबत स्पष्ट आणि जाहीर संकेत मानले जात आहेत.

- Advertisement -

खडसे यांचे मंत्रिपद भ्रष्टाचार झाल्याच्या कारणास्तव काढून घेण्यात आले. मात्र इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप होऊनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे नाराज असलेल्या खडसेंनी वेळोवेळी पक्षाला खडेबोल सुनावले. मात्र तरी याची दखल नेतृत्वाने घेतली नाही. मंगळवारी त्यांनी पक्ष नेत्यांना सूचक इशारा दिला. आपल्यासमोर काँग्रेसचा पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी एकार्थी दाखवून दिले. याआधी काँग्रेसचे खासदार आणि प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडसे यांना पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांना आवाहन केलेय. त्यामुळे खडसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर भाजपला तो मोठा धक्का असेल.

पक्ष बांधणी आणखी पक्ष मजबूत करण्यासाठी जळगावात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण या महत्त्वपूर्ण बैठकीलाही खडसे अनुपस्थित होते. या बैठकीला खास निरोप पाठविलेल्या पदाधिकार्‍यांनाच निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीतून काही विद्यमान आमदारांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -