घरताज्या घडामोडीआम्हीच शिवसेना, विधिमंडळात आम्हाला मान्यता; दिल्लीतही एकनाथ शिंदेचा पक्षावर दावा

आम्हीच शिवसेना, विधिमंडळात आम्हाला मान्यता; दिल्लीतही एकनाथ शिंदेचा पक्षावर दावा

Subscribe

महाराष्ट्रातील लोकांना हवे असलेले सरकार आम्ही स्थापन केले, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. तसेच, आम्हीच शिवसेना आहोत. विधिमंडळात शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केला. तर, आषाढी वारीनंतर खातेवाटपावर चर्चा होईल, असंही सांगण्यात आलं.

नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे दिल्लीत गेले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. तर, आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), भाजपाचे राष्ट्रीय अ्ध्य़क्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची भेट घेतली.

- Advertisement -

हेही वाचा १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद धनुष्यबाणामध्ये, राऊतांनी नाशिकमध्ये डागली तोफ

यादरम्यान शिंदे आणि फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असून केंद्राचे सहकार्य आणि आशीर्वाद घेण्याच्या दृष्टीने ही भेट होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपाने एकत्रितपणे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली होती. नागरिकांनीही या भरघोस मतदान करून युतीला विजयी केले होते. हा जनादेश ओळखून त्यांना हवे असलेले सरकार आम्ही स्थापन केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

केंद्राचं सहाकार्य ते राज्य प्रगती करतं

केंद्र सरकारचं सहकार्य ज्या राज्याला मिळतं ते राज्य वेगाने प्रगती करतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या युतीतून लोकांच्या हिताचं जपणूक करणारं, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो अजेंडा आहे त्या अजेंडाला न्याय देणारं हे सरकार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची देखील मदत, सहकार्य, आशीर्वाद आवश्यक आहेत. म्हणून मोदींना भटेणार, महाराष्ट्राचं व्हिजन समजून घेणार.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंवरील टीकेवर शिंदे गट नाराज; पण भाजपाकडून टीकास्त्र सुरूच

आशीर्वादासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट

एका विचारातून, बाळासाहेबांच्या भूमिकेतून या सगळ्या घडामोडी घडल्या. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत निवडणुका लढवल्या. त्यामुळे लोकांच्या मनातील सत्ता, सर्वसामान्य लोकांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यामुळे नवं सरकार स्थापन झाल्याने आम्ही कालपासून वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेट घेत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

लोकांच्या हिताचं जपणूक करणारं, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काही अजेंडा आहेत. या अजेंडाला न्याय देण्यासाठी हे सरकार काम करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचं सहाकार्य मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही मोदींना भेटायला आलो आहोत. त्यांच्याकडेही महाराष्ट्रासाठी काहीतरी व्हिजन आहे. ते व्हिजन समजून घेण्यासाठी आम्ही मोदींना भेटणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसंच, ज्या राज्याला केंद्राची मदत मिळते ते राज्य वेगाने प्रगती करतं असंही शिंदे म्हणाले.

हेही वाचा – शिवसेना आता कदापी उभी राहणार नाही, नारायण राणेंची बोचरी टीका

कसले खोके? मिठाईचे? संजय राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ५० आमदारांना ५० खोके मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. आज नाशिकच्या मेळाव्यात त्यांनी शिंदे गटावर आरोप केले. हे ५० खोके यांना पचणार नसल्याचंही संजय राऊत म्हणाले. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की कसले खोके, मिठाईचे खोके का?. हे ५० आमदार पैशांनी विकत घेऊन आलेले नाहीत. स्वेच्छेने आलेले आहेत. ग्रामपंचायतीतील एखादा सरपंच किंवा नगरसेवकही पक्षांतर करताना हजारवेळा विचार करतो. मग विचार करा की ५० आमदार का गेले असतील? पैशांच्या जीवावर हे आमदार फुटले नाहीत. हे आमदार स्वेच्छेने आलेले आहेत. ते पैशांनी विकलेले नाहीत.

मुक्याचा मार सहन केला

महाविकास आघाडीत आम्ही मुक्याचा मार सहन केला. या आमदारांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात काम करण्यासाठी निधी मिळाला नाही. सभागृहात सावकरांबद्दल बोलू शकत नव्हतो. दाऊद कनेक्शन असलेल्या लोकांसोबत बसावं लागत होतं. म्हणूनच आम्ही उठाव करत भाजपसोबत युती स्थापन केली.

सत्तांतराची नोंद जगाने घेतली

महाराष्ट्रात ज्या घडामोडी घडल्या त्याची नोंद देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने घेतली. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालात युती सरकारने भरपूर कामे केली. समृद्ध महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, जनतेच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं काम या काळात झालं आहे. मात्र, मधल्या अडीच वर्षांच्या काळात काही कामं खंडित झाली होती. मात्र, आता ही कामं पूर्ण होतील.

आषाढी वारीनंतर खातेवाटप

एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी झाली असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, खातेवाटपावर आषाढी वारीनंतर चर्चा होणार असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. दिल्ली दौर्‍यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -