घरताज्या घडामोडीअडीच वर्षापासून आमदारांच्या मनात खदखद - एकनाथ शिंदे

अडीच वर्षापासून आमदारांच्या मनात खदखद – एकनाथ शिंदे

Subscribe

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर आता महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे. कुणावरही व्यक्तिगत टीका करायची नाही. आम्ही ती करणारही नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक होतो, आहे आणि राहणार आहे. धर्मवीर आनंद दिघे आमच्यासाठी दैवत आहेत. त्यांना बाळासाहेबांनी हिंदुत्वाचे विचार दिले. तेच आम्हाला पुढे मिळाले. तसेच अडीच वर्षापासून आमदारांच्या मनात खदखद होती, अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, काल जो गटनेता निवडला गेला तो गटनेता नियमबाह्य निवडला गेला. कारण सर्व आमदारांची निवड पद्धती ही बहुमताने निवडण्याची आहे. परंतु बहुमताचा आकडा आमच्यासोबत असल्यामुळे मला वाटतं की, त्यांनी ज्याप्रकारे निवड केली ही अवैध पद्धतीने करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांपासून आमदारांच्या मनात खदखद आणि रोष होता. त्यामध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत. ही आमदार ३ ते ४ लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सद्सदविवेक बुद्धीला धरून निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे जे काही आमदार आहेत. ते हिंदुत्वाचे मुद्दे, मतदार संघातील मुद्दे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरील मुद्दे असतील, ही या नेत्यांची विचारधारा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्याकडे ४५ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कालपर्यंत सूरतमध्ये असलेले सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे मध्य रात्रीत गुवाहटीत दाखल झाले. परंतु आज ते दुपारपर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे शिंदेंची पुढची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या पत्राची चर्चा, नेमकं काय आहे पत्रात?

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -