घरमहाराष्ट्रVirar Fire: विरार रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत

Virar Fire: विरार रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत

Subscribe

मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी ५ लाख रुपये जाहीर

विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आगीची चौकशी करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन, पोलीस उपायुक्त संजय पाटील, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. या दुर्घटनेची 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत,

- Advertisement -

आज शुक्रवारी पहाटे विजय वल्लभ हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आग लागली तेव्हा त्याठिकाणी १७ रुग्ण होते. या १७ पैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात ५ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. या आगीच्या घटनेमुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

या घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये देणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत या रुग्णालयातील इतर रुग्णांना झळ पोहचू नये यासाठी त्यांची  इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत. आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे करत सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.


Virar Fire: विरार रुग्णालय आग दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -