घरताज्या घडामोडीचांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक, पुणे वाहतूक पोलिसांची माहिती

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज पुन्हा ट्रॅफिक ब्लॉक, पुणे वाहतूक पोलिसांची माहिती

Subscribe

वाहतूक कोंडीसाठी कारण ठरत असलेला पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरही आज दुपारी पुन्हा एकदा ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. यासंदर्भातील माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. पुलाच्या बाजूचा खडक फोडण्याचे काम बाकी असल्यामुळे आज २ वेळा या मार्गावरील वाहतूक २० मिनिटं बंद करण्यात येणार आहे.

खडक फोडण्याचे काम देखील ब्लास्ट पद्धतीने होत असल्याने दोन्ही बाजूने वाहतूक २० मिनिटं बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १ ते २ च्या दरम्यान २०० मी. लांब गाड्या २० मिनिटांसाठी थांबवल्या जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री हा पूल पाडण्यात आला असून आता रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडक असल्यामुळे या खडकाला ब्लास्ट करून फोडण्याचे काम करण्यात येणार आहे.

पूल पाडण्यासाठी तब्बल ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. परंतु तरीही पूल पूर्णपणे पडलेला नव्हता. जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्यानं पुलाला जमिनदोस्त करण्यात आलं. सकाळपर्यंत पुलाचा राडारोडा उचलण्याचं काम सुरू होतं.

- Advertisement -

हेहीै वाचा : मुलायमसिंह यादव व्हेंटिलेटरवर, पंतप्रधान मोदींनी अखिलेशना फोन करून केली चौकशी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -