घरमहाराष्ट्रबाजारातील मिठाई खरेदी करताना काळजी घ्या - एफडीए

बाजारातील मिठाई खरेदी करताना काळजी घ्या – एफडीए

Subscribe

आता दिवाळीला काही दिवस बाकी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बाजारातील दुकानांमध्ये मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ दाखल झाले आहेत. पण, यंदा बाजारात दाखल झालेली मिठाई तुमच्यासाठी घातक ठरु शकते.

विद्युत रोषणाई, फटाके आणि मिठाईशिवाय दिवाळी हा सण पूर्ण होत नाही असं म्हणतात. आता दिवाळीला काही दिवस बाकी आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बाजारातील दुकानांमध्ये मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ दाखल झाले आहेत. पण, यंदा बाजारात दाखल झालेली मिठाई तुमच्यासाठी घातक ठरु शकते. या भेसळयुक्त मिठाईच्या सेवनाने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. दिवाळीच्या दिवसांत पदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीचं प्रमाण लक्षात घेता कुठल्याही प्रकारची मिठाई पदार्थ खरेदी करताना मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आधीच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनने केलं आहे.

हेही वाचा – पीएमसी बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित; आरबीआयचा निर्वाळा

- Advertisement -

एफडीएचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

दिवाळीच्या काळात खाद्यतेल, तूप आणि मिठाई या खाद्यपदार्थांची मागणी प्रचंड वाढते. या मागणीसोबत खाद्यपदार्थांमागे भेसळ होण्याचं प्रमाणंही वाढतं. भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनाने नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी अन्न आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबईकरांना मिठाई खरेदी करताना सावधानतेचा इशारा दिलाय. दरवर्षी एफडीएच्या अन्न विभागाद्वारे महाराष्ट्र आणि गुजरातहून येणारा भेसळयुक्त मावा जप्त केला जातो. पण, या वर्षी एफडीएचे अनेक अधिकारी इलेक्शनच्या ड्युटीवर असल्याकारणाने कारवाईलाही विलंब होत आहे.

हेही वाचा – चेंबुरमध्ये रास्ता रोको आंदोलन चिघळले; पोलिसांवर दगडफेक

- Advertisement -

भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळावेत – एफडीएचे सह-आयुक्त

याविषयी बोलताना एफडीएच्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले की, ‘‘दिवाळीच्या सणात आकर्षक दिसणाऱ्या मिठाईची मागणी प्रचंड वाढते. या काळात अनेक मिठाई विक्रेत्यांकडे ग्राहकांची लांबचलांब रांगा दिसून येतात. तसंच मिठाई सुंदर आणि आकर्षक दिसावी यासाठी त्यात अधिक खाद्यरंग वापरले जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अशी भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळावेत.’’ केकरे पुढे म्हणाले, ‘‘ दिवाळीच्या तोंडावर मिठाईसह खवा, रवा मैदा, बेसन, कणीक(पीठ), बेसन, तेल, तूप यांची मागणी वाढते. सणासुदीत दरवर्षी या पदार्थांचे नमूने घेतले जातात. यंदाच्या वर्षी हे काम ‘अन्न व सुरक्षा मानकं प्राधिकरण’कडे (एफएसएसआय) सोपवले आहे. त्यानुसार खासगी अधिकाऱ्यामार्फत सर्व दुकानाची तपासणी सुरू करण्यात आलीये. 31 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून या काळावधीत दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाईल.’’

दिवाळीत सर्वात जास्त भेसळ

गेल्या वर्षी अन्न आणि औषध प्रशासनकडून (एफडीए) दिवाळीदरम्यान केलेल्या कारवाईदरम्यान ३ हजार ९०९ लीटर भेसळ आणि कमी गुणवत्ता असलेले तेल आणि तुप जप्त केलं होतं. अधिकाऱ्यांनी ३ हजार ८७१ किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली होती. तसंच, बर्फी आणि चॉकलेट असं एकूण १ हजार ७४३ किलोचा माल जप्त केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -