घरमुंबईतब्बल ३० तासांनंतर निवडणूक कर्मचारी घरी परतले

तब्बल ३० तासांनंतर निवडणूक कर्मचारी घरी परतले

Subscribe

दुपारपर्यंत अनेक ठिकाणी मतदानानंतरचे काम सुरू होते. आता उद्यापासून पुन्हा एकदा मतमोजणीच्या कामासाठी कर्मचारी सज्ज होणार आहेत.

विधानसभेसाठी सोमवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेले काम अनेक ठिकाणी आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास संपले. त्यानंतर मतमोजणीसाठीच्या चाचणीचेही काम करण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी मतदानानंतर आज दुपारी तब्बल ३० तासांनंतर अनेक कर्मचारी आणि अधिकारी घरी परतले. दुपारपर्यंत अनेक ठिकाणी मतदानानंतरचे काम सुरू होते. आता उद्यापासून पुन्हा एकदा मतमोजणीच्या कामासाठी कर्मचारी सज्ज होणार आहेत.

आज दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन सिलिंगचे काम सुरू होते. राजकीय पक्षांच्या एजंटसमोर हे मशीन सिल करून स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. मुंबई शहरात ३६ ठिकाणी मतमोजणी येत्या २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी करिता स्वतंत्र केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मुंबई जिल्ह्यात १० विधानसभांसाठी मतमोजणी केंद्र तर उपनगरात एकुण २६ विधानसभांसाठीचे मतमोजणी केंद्र असणार आहेत. याठिकाणचा पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. संपूर्ण मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सुसज्ज आहे. तसेच मतमोजणीच्या कामासाठी अधिकारी/कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत अत्यंत पारदर्शीपणाने, काळजीपूर्वक व अचूकतेने मतमोजणी पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

अशी होईल मतमोजणी

मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलनिहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील १४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -