Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'या' कारणांमुळे NCPने नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष, शरद पवारांनी स्वतःच सांगितले

‘या’ कारणांमुळे NCPने नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष, शरद पवारांनी स्वतःच सांगितले

Subscribe

सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची कोणतीच जबाबदारी नव्हती. तर सुप्रिया सुळेंची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्याध्यक्षाची जबाबदारी देण्याबाबतचे स्पष्टीकरण शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.

नवी दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवर भाकरी फिरवत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोघांचीही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यावेळी सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगानंद शास्त्री, के.के. शर्मा, फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी देण्यात आली नाही. पण ही जबाबदारी अशा पद्धतीने का देण्यात आली आहे, याबाबतचे स्पष्टीकरण शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव अजित पवारांनीच दिला होता, राष्ट्रवादीच्या महिला खासदाराचा खुलासा

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची कोणतीच जबाबदारी नव्हती. तर सुप्रिया सुळेंची निवड हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्याध्यक्षाची जबाबदारी देण्याबाबतचे स्पष्टीकरण शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. तर लवकरच देशभरात लोकसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वच नेत्यांना सर्वच राज्यात लक्ष देता येणार नाही. ज्यामुळे ज्या नेत्यांची ज्या राज्यासाठी नेमणूक केली आहे, अशा नेत्यांना महिन्यातील चार दिवस हे पक्ष बांधणीसाठी देता येतील, असा या नियुक्त्यांमागचा हेतू असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, पुढच्या तीन चार महिन्यात कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक लढवू शकतो, याची चाचपणी केली जाईल, असेही शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मागच्या दोन महिन्यांपासून याबाबत चर्चा करण्यात येत होती. त्यानंतर हा लोकांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शरद पवारांनी सांगितले.

23 तारखेला विरोधकांची पाटण्यात बैठक

- Advertisement -

येत्या 23 जून रोजी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भाजपविरोधात निवडणूक लढवण्यासाठी रणनिती आखण्यात येणार आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका विरोधकांनी एकत्र कशा लढवायच्या याबाबत निर्णय होऊ शकतो. ज्या ठिकाणी भाजप मजबूत आहे त्या ठिकाणी विरोधकांनी एकत्र येऊन भाजप विरोधात निवडणूक लढवू, याबाबतची चर्चा केली जाईल, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -