धुळ्यातील काँग्रेसचा माजी आमदार शिवसेनेत दाखल, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

माजी आमदार शरद पाटील यांनी पुन्हा शिवबंधन बांधले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते धुळे ग्रामीणचे माजी आमदार आहेत.

आमदार आणि त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते-नगरसेवक शिवसेनेला रामराम ठोकत असताना शिवसेनेसाठी आज दिलासादायक बातमी आली आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी पुन्हा शिवबंधन बांधले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते धुळे ग्रामीणचे माजी आमदार आहेत. (Former Congress MLA from Dhule joins Shiv Sena, joins party in the presence of Uddhav Thackeray)

हेही वाचा …मग काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का? निलेश राणे यांचा शिवसेनेला सवाल

शरद पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून २००३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला. मात्र, शिवसेनेने त्यानंतर शरद पाटील यांना उमेदवारी न दिल्याने ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, आता शिवेसनेचे अनेक बंडखोर आमदारांनी शिवसेनेत फुट पाडली असून नवा गट स्थापन केला आहे. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदारांसह अनेक माजी नगरसेवकही शिंदे गटात सामिल होत असल्याने शिवसेनेतील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. असं असतानाही शरद पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वार विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, आनंदाच्या क्षणीच नाही तर दुःखाच्या वेळीही मी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं शरद पाटील पक्षप्रवेशावेळी म्हणाले.

काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-शिवसेना असा प्रवास केलेल्या शरद पाटील यांना शिवसेनेत आता कोणतं स्थान मिळतं, हे पाहावं लागेल.