घरताज्या घडामोडीगजानन कीर्तिकर म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपा मजबूत आहे...

गजानन कीर्तिकर म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपा मजबूत आहे…

Subscribe

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राज्यभरात दौरे करत आहेत. अशातच जालनाच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजप आणि सेनेच्या युतीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचे नेते राज्यभरात दौरे करत आहेत. अशातच जालनाच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजप आणि सेनेच्या युतीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (gajanan kirtikar said bjp will not came in power without shivsena in maharashtra gave examples of history)

भाजपची देश पातळीवरील वाटचाल आणि महाराष्ट्रातील वाटचाल यावर कीर्तिकर यांनी भाष्य केले आहे. ‘राष्ट्रीय स्तरावरील सत्तेची सर्व सूत्रे भाजपा कडे आहेत, मात्र महाराष्ट्राबाबत विचार केला तर सत्तेची सूत्र एकहाती भाजपच्या हातात कधीच मिळालेली नाहीत आणि मिळण्याची शक्यताही नाही’, असे थेट व्यक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्रात भाजप कमकुवत आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात ती शिवसेना पेक्षा मजबूत आहे असही आम्ही मान्य करणार नाही”, असे स्पष्ट वक्तव्यसुद्धा कीर्तिकर यांनी केले आहे.

“भाजपा राष्ट्रीय स्तरावर ३५० खासदार निवडून आणू शकते. महाराष्ट्राबाहेर शिवसेना नाही. पण महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २६-२२ असे वाटप झाले होते. आमचे १८ आले ४ पडले, त्यांचे २३ आले ३ पडले ही स्थिती आहे.राष्ट्रीय स्तरावर जरी भाजपाने ३५० खासदार निवडून आणले तरी, महाराष्ट्रात त्यांची स्थिती वेगळी आहे. २०१९ ला विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे जागावाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेला १२६ आणि भाजपला १६२ जागा असे वाटप झाले होत. १६२ मधून १०५ आले आणि १२६ मधून आम्ही ५६ जण निवडून आलो. यावेळचा फॉर्म्युला ही १०० टक्के तसाच असला पाहिजे”, असेही गजानन कीर्तिकर म्हणाले.

- Advertisement -

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. देशातील व महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. राज्यात होणारी राजकीय उलथापालथ बघता आगामी काळाता अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्याता वर्तवल्या जात आहेत.


हेही वाचा –  “सर्वांचीच तोंडे बंद…” अजित पवारांच्या खुलाशानंतर अमोल मिटकरींचा सर्वांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -