घरताज्या घडामोडीऔरंगाबाद नको, संभाजीनगर सर्च करा; गुगल मॅपनेही केलं नामांतर

औरंगाबाद नको, संभाजीनगर सर्च करा; गुगल मॅपनेही केलं नामांतर

Subscribe

महत्त्वाचं म्हणजे, गुगल मॅपवरही औरंगाबादचं नाव बदलून आता संभाजीनगर झालं आहे. म्हणजेच, तुम्ही गुगल मॅपवर संभाजी नगर सर्च केलंत तरी तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल.

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यावरून राज्यात बरीच उलथापालथ झाली. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ पासून हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, गुगल मॅपवरही औरंगाबादचं नाव बदलून आता संभाजीनगर झालं आहे. म्हणजेच, तुम्ही गुगल मॅपवर संभाजी नगर सर्च केलंत तरी तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचाल. (Google Map renamed aurangabad name as sambhajinagar)

हेही वाचा – औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामांतर; शिंदे सरकारचे शिक्कामोर्तब

- Advertisement -

महाविका आघाडीसरकारच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंनी औंरगाबादचं नाव संभाजीनगर असं केलं. मात्र, या नामांतराला शिंदे-फडणवीस सरकारने आक्षेप घेतला. अल्पमतात असलेल्या सरकारला मंत्रिमंडळ बैठक बोलवण्याचा अधिकार नसतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच, हे नामांतरही बेकायदा असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांनी बैठक घेऊन या नामांतरावर नव्याने शिक्कामोर्तब केलं आणि नामांतराचं श्रेय घेतलं. मात्र, औरंगाबादच्या नामांतराला अद्यापही विरोध सुरूच आहे. त्यामुळे याबाबतचा शेवटचा निर्णय आता केंद्र सरकार घेणार आहे.

हेही वाचा – औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशीव नामांतर, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

- Advertisement -

जगाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात पोहोचायचं असेल तर गुगल मॅप हा सर्वात सोपा मार्ग आहे. अनेक गल्ली-बोळातील रस्तेही गुगल मॅपवर सहज शोधले जातात. त्यातच, गुगल मॅपनेही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असा केला आहे. गुगल मॅपवर संभाजीनगर असं शोधल्यास तुम्हाला योग्य मार्ग दिसेल तसेच कंसात औरंगाबाद असंही दिसेल. शिवाय, तुम्ही औरंगाबाद सर्च केल्यानंतर संभाजीनगर या नावाने रिझल्ट मिळत आहे.

शिवसेनेकडून १९८८ सालापासून औरंबादच्या नामांतराची मागणी केली जातेय. शिवसेनेकडून नेहमीच संभाजीनगर असाच उल्लेख केला जातो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -