घरमहाराष्ट्रट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी पालकमंत्री भुजबळ उतरले रस्त्यावर

ट्रॅफिक जॅम सोडवण्यासाठी पालकमंत्री भुजबळ उतरले रस्त्यावर

Subscribe

नाताळच्या सुट्ट्या आणि वीकेण्डमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी

नाताळच्या सुट्या आणि वीकेण्डमुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची संख्या वाढून घोटी टोलनाक्यावर शुक्रवारी (दि.२५) मोठी कोंडी निर्माण झाली होती. याचवेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ ताफा थांबवून स्वतः रस्त्यावर उतरले आणि वाहतूक सुरळीत केली.

वाहनांच्या गर्दीमुळे टोल नाक्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच पालकमंत्री भुजबळांनी आपला ताफा थांबवून स्वतः उभे राहून सर्व वाहने सोडण्याच्या सूचना केल्या. यानंतर येथील वाहतूक सुरळीत होईपर्यंत ते थांबून होते. वाहतूक कोंडी न होण्यासाठी त्यांनी टोल प्रशासन अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिकच्या दिशेने रवाना झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -