घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुळबाळ होत नसल्याने छळ-मारहाण; जाचाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवले जीवन

मुळबाळ होत नसल्याने छळ-मारहाण; जाचाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी मारून संपवले जीवन

Subscribe

नाशिक : सासरच्या जाचाला कंटाळुन विवाहीत महिलेने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. याबाबत सासरच्या मंडळी विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील सखुबाई जालिंदर डहाळे, वय २८ या विवाहीत महिलेने मूलबाळ नसल्यामुळे तिच्या घरचे लोक वांझोटी बोलून तिला वारंवार टोमणे मारत होते. यासह तिला मारहाण करीत होते. या प्रकाराला कंटाळून तिने विहिरीत उडी मारत आत्महत्या करीत आपला जीव संपवला.

सखुबाई जालिंदर डहाळे वय २८ असे ह्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. यशवंत नागू नवाळे रा. खडकेद यांनी इगतपुरी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्या केलेल्या महिलेचे पती जालिंदर नारायण डहाळे वय २८, मावस सासू लहानुबाई दमा तातळे वय ५०, नणंद सुगंधा काळू जाखेरे वय ३४, नणंदोई काळू मारुती जाखेरे वय ३६ यांच्यावर आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ३४ नुसार हा गुन्हा दाखल असून इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस पथक तपास करीत आहेत.

- Advertisement -

नोकरी मिळत नसल्याने युवकाची आत्महत्या

पदवीधर होउनही कुठेही नोकरी मिळत नसल्याने युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. रोहीत संजय वाघ (२२, रा. आदित्य भवन, नासर्डी पुलाजवळ, द्वारका) असे या युवकाचे नाव असून, भाऊच आपला सांभाळ करीत असून त्यांना कोणतीही मदत करू शकत नसल्याचे शल्य त्यास बोचत होते. यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून समोर आले आहे.
रोहित याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता. मात्र, प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याचा सांभाळ त्याचे भाऊच करीत होते. याच नैराश्यातून रोहित याने सोमवारी (ता. २६) रात्री राहत्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेतला. सदरची बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -