घरताज्या घडामोडीNitesh Rane : युक्तिवाद संपला ! नितेश राणेंच्या जामिनाचा मंगळवारी फैसला

Nitesh Rane : युक्तिवाद संपला ! नितेश राणेंच्या जामिनाचा मंगळवारी फैसला

Subscribe

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही वकिलांमध्ये युक्तिवाद झाला असून कोर्ट आपला निर्णय उद्या (मंगळवार) दुपारी ३ वाजता घेणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू मांडली आणि नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी नितेश राणे यांची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा पूर्ण झाल्यानंतर नितेश राणेंचा जामीन मंजूर होणार की नाही?, यासंदर्भातील अंतिम निर्णय उद्या होणार आहे.

दोन्ही पक्षांकडून कोर्टात युक्तिवाद ?

दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला असून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे हे या गटामध्ये सहभागी होते आणि त्यांच्याच माध्यमातून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी. त्यानंतर त्यांच्या जामीनावर सुनावणी व्हावी, अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला. नितेश राणेंचा शरण अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर नितेश राणे बेकायदेशीररित्या शरण आले, असा युक्तिवाद प्रदीप घरत यांनी केला. राणे जर न्यायालयात उपस्थित आहेत तर वेगळे निर्णय करण्याची आणि शरण या शब्दाची गरज काय, असा सवाल सरकारी वकिलांनी उपस्थित केला.

- Advertisement -

नितेश राणेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

नितेश राणेंचा कुठल्याही परिस्थितीत सचिन सातपुते यांच्याशी संबंध नव्हता. जे फोटो काढण्यात आले ते फोटो राणे लोकप्रिय असल्यामुळे काढले गेले असावेत, अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात आला. नितेश राणेंना पोलीस कोठडीची गरज काय, असा सवाल सतीश मानेशिंदे यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात १० दिवसांचं संरक्षण जे नितेश राणेंना देण्यात आलेलं आहे. यामध्ये शरण येणे किंवा इतर प्रक्रिया करणे याची गरज नाही, यासंदर्भात दाखला देण्यासाठी निकाल देखील सतीश मानेशिंदे यांनी वाचून दाखवले. त्यानंतर नितेश राणे ज्या दिवशी पोलिसांसमोर हजर राहिले. त्यावेळी मोबाईल संदर्भात कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही, या प्रकारची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आलेली असून पोलिसांना आता नितेश राणेंची कशासंदर्भात चौकशी करायची आहे आणि नितेश राणेंची पोलीस कोठडी कशासाठी हवीय, असा सवाल सतीश मानेशिंदे यांनी उपस्थित केला होता.

नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर

आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली. नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात आमदार नितेश राणे यांचाही सहभाग होता असा आरोप करण्यात येत आहे. नितेश राणेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून जिल्हा सत्र न्यायालयात शरण जाण्यास सांगितले होते. त्यानुसार नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले.

- Advertisement -

हेही वाचा : Tim Bresnan Retirement:इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -