घरमहाराष्ट्रपुणेHoney Trap : पाकच्या संपर्कात असलेल्या DRDOच्या संचालकाला एटीएसकडून अटक

Honey Trap : पाकच्या संपर्कात असलेल्या DRDOच्या संचालकाला एटीएसकडून अटक

Subscribe

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांना भारताशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याच्या संशयातून संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात DRDO च्या संचालकांना एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती पुरवल्याच्या संशयातून संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात DRDO (Defense Research And Development Organization) च्या संचालकांना एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातून एटीएसने डॉ. प्रदीप कुरूलकर यांना अटक केली आहे. डॉ. कुरूलकर यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती पुरवल्याचा संशय दहशतवादविरोधी पथकाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. तर हे Honey trap प्रकरण असल्याचे देखील सांगितले जात आहे. तर या अधिकाऱ्याने अनेक क्षेपणास्त्रांसहित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – मोदी-शाहांच्या हिंदुत्वात शांतता प्रस्थापित करण्याचा हाच मार्ग…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार DRDO या संस्थेत काम करणारे डॉ. प्रदीप कुरूलकर हे नकळतपणे हनी ट्रॅप प्रकरणात अडकले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून या अधिकाऱ्याला पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. ज्यानंतर ते गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर ते पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते.

पण अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता, 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

डॉ. प्रदीप कुरूलकर हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. मात्र, नकळतपणे ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. तर डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी खरचं कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आहे का? याचा एटीएसकडून अधिक तपास केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -