घरताज्या घडामोडीमी फडणवीसांच्या शब्दापुढे नाही : भुजबळ

मी फडणवीसांच्या शब्दापुढे नाही : भुजबळ

Subscribe

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने त्या नाराज असल्याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रीपदाबाबतचा निर्णय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, यावर मी तुर्तास भाष्य करणार नाही, याबाबत फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे, मी फडणवीस यांच्या शब्दच्या पुढे जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. केंद्रिय मंत्रीपदावरून मुंडे भगिनी नाराज असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. मुंडे भगिनींची बदनामी करू नका असे फडणवीस म्हणाले मीही त्या मताशी सहमत आहे. शेवटी हा त्यांचा आंतरिक प्रश्न आहे. माझयापेक्षा फडणवीस यांना त्यांच्याबाबत अधिक माहीती आहे असे सांगत याविषयी त्यांनी अधिक भाष्य टाळले. ओबीसी नेतृत्वाला डावलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी तुर्तास भाष्य करणार नसल्याचे सांगत हा वेगळा विषय असल्याचे सांगितले. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नका अशी मागणी केली या मागणीला भुजबळ यांनीही समर्थन दर्शवले.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते याबाबत ते म्हणाले, अध्यक्षपद हे काँग्रेसलाच दिलं जाणार आहे. यात काही वाद नाही पण कोविडमुळे सगळेच हजर राहू शकत नाही. अशावेळी निवडणूक कशी घ्यायची म्हणून ते थांबवले आहे पण लवकरच निवड प्रक्रिया राबवली जाईल अन काँग्रेसचाच अध्यक्ष होईल याबाबत माझ्या मनात शंका नसल्याचे ते म्हणाले.

नाराजी व्यक्त करण्यापेक्षा लस द्या
महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत विचारले असता, पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा लस उपलब्ध करून द्यावी असा टोला भुजबळांनी लगावला. आज नाशिकमध्येच जर आपण बघितले तर पूर्वी ४८ हजार रूग्ण होते ते आता सतराशेपर्यंत आले मग रूग्णसंख्या वाढली की कमी झाली याचाही अभ्यास करावा नाशिकच नव्हे तर राज्यात रूग्णसंख्या कमी होत आहे पण काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -