घरमहाराष्ट्रपुणेमी शंभर टक्के सत्यच बोललो, पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर फडणवीस ठाम

मी शंभर टक्के सत्यच बोललो, पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर फडणवीस ठाम

Subscribe

पुणे – शरद पवारांच्या सल्ल्यानेच पहाटेचा शपधविधी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यभर बरीच खळबळ माजली. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. परंतु, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना खोट्यात पाडण्याकरता प्रत्युत्तर दिले. फडणवीसांनी असत्याचा आधार घेत अशापद्धतीचं वक्तव्य केलं आहे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, त्यावरही फडणवीसांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर आणखी एका नेत्याचा खुलासा

- Advertisement -

मी जे बोललो ते शंभर टक्के सत्य बोललो आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. पुण्यातील गिरीश बापट यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.

असत्याचा आधार घेत फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत वक्तव्य केलं आहे, असं शरद पवार म्हणाले होते. याबाबत त्यांना आज फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर ते आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. मी जे बोललो ते शंभर टक्के सत्य बोललो आहे. मात्र, त्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहे. यापेक्षा जास्त बोलणार आहे, योग्यवेळी बोलणार आहे. ती योग्य वेळ येईलच, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात राजकीय नाट्य रंगले होते. राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राजभवनात जात भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली होती. या पहाटेच्या शपथविधीमुळे राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यांचं हे सरकार अल्पकाळ टिकलं. अवघ्या ७२ तासांत त्यांना काडीमोड घ्यावा लागला. या प्रकरणाला चार वर्षे उलटून गेली असली तरीही हा पहाटेचा शपथविधी कोणाच्याही स्मरणीकेतून बाहेर पडलेला नाही. आतासुद्धा हा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यावरूनच पहाटेचा शपथविधी पार पडला होता, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात केला होता. त्यावरून शरद पवारांनीही फडणवीसांना प्रत्युत्तर देत या शपथविधीमागे माझा हात नसल्याचं स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -