घरमहाराष्ट्रफडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर आणखी एका नेत्याचा खुलासा

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर आणखी एका नेत्याचा खुलासा

Subscribe

यासाठी त्यांनी शेतराखणीचे उदाहरण देत थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्या असणाऱ्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चार वर्षापूर्वी पहाटे शपथ घेऊन अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याच्या घटनेला चार वर्ष झाली. २०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पहाटेचीही शपथविधी यंदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. हा गौप्यस्फोट पहाटेच्या त्या शपथविधीपेक्षाही हादरवून सोडणारा आहे. देवेंद्र फडणवीस पाठोपाठ आता आणखी एका नेत्याने मोठा खुलासा केलाय.

“विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेली पहाटेची शपथविधी ही राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहमतीनेच झाली होती. अजित पवारांना आमच्यासोबत येण्याचा निर्णय होता. परंतू शरद पवार पलटले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केलाय. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्यावर आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. सदाभाऊ खोत यांनी या शपथविधीचे वर्णन करताना आपल्या ग्रामीण भाषेची स्टाईल वापरली आहे. “शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही कारण अजित दादा निर्णयच घेऊ शकत नाहीत,”असं म्हणत खोत यांनी टोला लगावला आहे. यासाठी त्यांनी शेतराखणीचे उदाहरण देत थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय.

आपल्या खास ग्रामीण भाषेत सदाभाऊ खोत म्हणाले की, “शेतामध्ये जेव्हा पीक येतं तेव्हा पीक आल्यानंतर तिथे राखण्या बसवला जातो. राखण्या पाखरांना येऊ देत नाही, मग पाखरांना प्रश्न पडतो की दाणे कसे खायचे. पाखर हुशार असतात ते १,२ दिवस शेतात येत नाहीत अन् राखण्याला वाटतं आता पाखर येणं बंद झाली आणि तो पण झोपून जातो, पण अचानक ही पाखरं येतात हल्ला करतात आणि दाने खाऊन जातात,” असं मार्मीक उदाहरण सदाभाऊ खोत यांनी दिलंय.

- Advertisement -

यापुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा पवारसाहेबांना कळले की आता आपल्याला थोडं शांत राहावं लागेल. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितलं की मी येतो तुमच्या बरोबर.अजितदादा येतील, घ्या उद्या शपथविधी. राष्ट्रपती राजवट उठवली आणि ‘राखण्या’ गेला की बरोबर दुसऱ्या दिवशी पवारसाहेबांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं,” असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -