घर उत्तर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शिर्डी ते भरवीर दरम्यान महिनाभरात तब्बल 4975 वाहनांचा नियमबाह्य प्रवास

समृद्धी महामार्गावर शिर्डी ते भरवीर दरम्यान महिनाभरात तब्बल 4975 वाहनांचा नियमबाह्य प्रवास

Subscribe

नाशिक : समृद्धी महामार्गावर असलेल्या शिर्डी ते भरवीर मार्गावरील अपघात रोखणे व सुरक्षितेच्या दृष्टीने २६ मे ते ३१ जुलै, २०२३ या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक कार्यालयाच्या वायुवेग पथकाने ४ हजार ९७५ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली.

समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर मार्गावर अपघात रोखण्यासाठी, वाहन तपासणी व वाहन चालकांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कक्ष स्थापित केला असून एण्ट्री व एक्झिटवर अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांद्वारे वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. यात वाहनाचे टायर, वाहनातील अतिरिक्त प्रवासी, वाहनांनुसार लेन तपासणी, अनधिकृतपणे उभी केलली वाहने, प्रवासी बस चालकांची ड्रंक अँड ड्राईव्हबाबत ब्रेथ नालायझरद्वारे तपासणी आदी बाबींची तपासणी केली जाते. ठराविक वेगमर्यादे पेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या वाहनांसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

- Advertisement -

याद्वारे वाहन अतिवेगात असेल तर ते शोधले जाते. २६ मे ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत वायुवेग पथकाने केलेली कारवाईत समृद्धी महामार्गावर वाहनाचे टायर अथवा वाहनाची योग्यता समाधानकारक आढळून न आल्याने प्रवेश नाकारण्यात आलेली ४ हजार २५२ वाहने, अतिरिक्त प्रवासी आढळून आलेली ३०५ वाहने, वाहनांना परावर्तक (रिफ्लेक्टीव टेप) न बसवलेली ११९ वाहने, चुकीच्या मार्गीकेतून वाहन चालविणारी १५८ वाहने, महामार्गावार अनधिकृतपणे उभी केलेली ११० वाहने व वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने चालणारी ३१ वाहने अशी एकूण ४ हजार ९७५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

वाहनचालकांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटकोर पालन करावे. अन्यथा कठोर कारवाईस तयार राहावे  : प्रदिप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -