Eco friendly bappa Competition
घर क्राइम Singapore : भारतीय नागरिकावर विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचा आरोप; दोषी आढळल्यास 10...

Singapore : भारतीय नागरिकावर विमा कंपन्यांची फसवणूक केल्याचा आरोप; दोषी आढळल्यास 10 वर्षांची शिक्षा होणार

Subscribe

Singapore : सिंगापूरमधील (Singapore) एका भारतीय नागरिकावर (Indian citizen) तेथील जिल्हा न्यायालयात दोन विमा कंपन्यांची (Insurance Companies) फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन परदेशी कामगारांच्या दुखापतीच्या दाव्यांशी संबंधित सेटलमेंट रकमेमध्ये सुमारे SGD 77,000 (सिंगापूर डॉलर्स) वितरीत करताना फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Singapore Indian citizen accused of defrauding insurance companies 10 years imprisonment if found guilty)

पोलिसांनी मंगळावारी (8 ऑगस्ट) एका निवेदनात म्हटले की, 48 वर्षीय साहा रणजीत चंद्रा यांनी विमा कंपन्यांना विश्वासात घेऊन फसवणूक केली आहे. ते कायदेशीर व्यवसाय कायद्यांतर्गत व्हाईटफील्ड लॉ कॉर्पोरेशनच्या अधिकृत व्यक्तीशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यासाठी न्यायालयाने मंगळवारी साहा रणजीत चंद्र यांच्यावर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. साहा रणजीत चंद्रा दोषी आढल्यास त्यांना प्रत्येक आरोपासाठी शिक्षा होईल. ही शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते आणि त्यांना दंडही भरावा लागेल, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मी पळता-पळता पडले, माझ्या वहिनीने मुलांना वाचवलं..”: मणिपूरमधून आणखी एक भयावह कहाणी समोर

पोलिसांनी म्हटले की, साहा रणजीत चंद्रा हे अनेक कंपन्यांमध्ये संचालक आहेत. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी जुलै 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान व्हाईटफील्ड लॉ कॉर्पोरेशनचे तत्कालीन संचालक वकील चार्ल्स येओ याओ हुई यांच्या नावाने विमा कंपन्यांशी वाटाघाटी केल्या आणि दुखापतींचे दावे निकाली काढले. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, चार्ल्स 2022 पासून फरार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ऑगस्ट 2022 मध्ये प्रलंबित असलेल्या गुन्हेगारी आरोपांसह अटक वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – बंदुकीच्या धाकावर अपहरण? आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह 15 जणांविरोधात गुन्हा

लोकसेवकाला खोटी माहिती दिल्याचा आरोप

साहा रणजीत चंद्रा यांच्यावर 15 जानेवारी 2022 रोजी कायदा मंत्रालयाच्या रजिस्ट्रार ऑफ रेग्युलेटेड डीलर्स या लोकसेवकाला खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. रॉयल ज्वेलरी नावाच्या कंपनीच्यावतीने मौल्यवान दगड आणि मौल्यवान धातूंच्या डीलरच्या परवान्यासाठी त्यांनी अर्ज करताना त्यांच्याविरोधात सिंगापूरमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती लपवून ठेवली होती. न्यायालया दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, साहा रणजीत चंद्रा कायदेशीररित्या अशी माहिती देण्यात बांधील होते. त्यामुळे प्रकरणातही ते दोषी आढळल्यास त्याच्या शिक्षेत सहा महिन्यांपर्यंत वाढ होऊ शकते, याशिवाय त्यांना SGD 5,000 पर्यंत दंड भरावा लागेल किंवा दोन्ही गोष्टी लागू होऊ शकतात.

- Advertisment -