घरताज्या घडामोडीLive Updates : विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Live Updates : विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Subscribe

 

विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

- Advertisement -

मेटेंचा लढा वाया जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

मराठा आरक्षणाचा चेहरा हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

विनायक मेटेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उपस्थित


विनायक मेटेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित


विनायक मेटेंच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत


विनायक मेटेंच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार


मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर मंगळवार १६ ऑगस्ट २०२२ रोजी कोविड लसीकरण बंद


उद्या सह्याद्री अतितीगृहावर चाहापानाचा कार्यक्रम

सर्व पक्षीय नेत्यांना चाहापानाला आमंत्रण

उद्या संध्याकाळी 5:30 वाजते मंत्रिमंडळाची बैठक


मुकेश अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, दहिरसरमधून एक संशयित ताब्यात

मुकेश अंबानी कुटंबीयांना धमकी देणाऱ्याला अटक


बिडमध्ये विनायक मेटे यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात

विनायक मेटेंच्या अंत्ययात्रेला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी


नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण


भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्र्यात ध्वजारोहण


शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9.15 वाजता मंत्रालयात ध्वजरोहणासाठी उपस्थित राहणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच संकल्प

पहिला संकल्प – आता देश मोठा संकल्प घेऊन जायला हवे. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. मोठा संकल्प, विकसित भारत.

दुसरा संकल्प – आजही आपल्या मनात गुलामगिरीचा अंश कोणत्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.

तिसरे संकल्प- आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हा तो वारसा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.

चौथे संकल्प – एकता आणि एकता. 130 कोटी देशवासीयांमध्ये एकता. ना स्वतःचा ना कोणी परका. एकतेची शक्ती ही एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी प्रतिज्ञा आहे.

पाचवा संकल्प – नागरिकांचे कर्तव्य. ज्यामध्ये पंतप्रधानही नाबाद आहेत, तर मुख्यमंत्रीही नाबाद आहेत. तेही नागरिक आहेत. येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात. जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात.


भारताची विविधता हीच भारताची अनमोल शक्ती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक लढतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत अंधकारयुगात जाईल, अशा अनेक कुशंका व्यक्त केल्या गेल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मात्र या देशाच्या मातीत सामर्थ्य आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपण अन्नाचे संकट झेलले. कधी युद्धाची शिकार झालो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दहशतवादाचे संकट आले. अनेक लोकांचा मृत्यू झाला. नैसर्गिक संकटं आली आहेत. अशी अनेक संकटं आली आहेत. मात्र भारत देश पुढे चालला आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तिरंगा, मातृभूमीसाठी अनेकांनी मोठी यातना सहन केली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या निमित्ताने देशाचे जवान, पोलीस, लोकप्रतिनिधी, सैनिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे शासक, प्रशासक यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यलढ्याबद्दल बोलताना आपण जंगलातील आदिवासी बांधवांचे स्मरण केले पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनून अनेक आदिवासी बांधवांनी मातृभूमिसाठी लढा लढण्याची प्रेरणा दिली – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यढ्याचे अनेक अंग आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी जगभरातील भारतीयांना भारताप्रती प्रेम असणाऱ्या सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यांची लढाई ही संघर्षमय राहिली आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा लढा लढला गेला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाला नमन करण्याचा आजचा दिवस आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्वातंत्र्यसैनिकांचे सकल्प पूर्ण करण्याची आपल्याला संधी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधन करणार

नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार

स्वातंत्र्यदिना निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन

भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -