मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण; अनेक योजनांच्या घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याची सध्य परिस्थिती आणि आगामी काळात वाटचाल करण्यासाठी समोर असलेले ध्येयधोरणं याचा आढावा घेतला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले. या ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राज्याची सध्य परिस्थिती आणि आगामी काळात वाटचाल करण्यासाठी समोर असलेले ध्येयधोरणं याचा आढावा घेतला. तसेच एकनाथ शिंदे यांनी अनेक योजनांची घोषणा केल्या. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जनतेला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून संबोधित केले. (Indian Independence Day cm eknath shinde talk on maharashtra)

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी शिंदे यांनी “गेल्या अडीच-पावणे तीन वर्षात कोरोनाच्या भयंकर विषाणूने आपल्याला बंधिस्त केले होते. आज संपूर्ण संकट गेलेले नाही, परंतू आपण कोरोनाने घातलेल्या बेड्या तोडल्या आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करत आहोत. तसेच येणारा गणेशोत्सव, दहिकाला यासह इतर धार्मिक सण आपण नेहमी प्रमाणे काळजी घेऊन जल्लोषात साजरे करणार आहोत”, असे म्हटले.

“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपले राज्य स्वातंत्र्यात न्हाहून निघालेले आहे. घरोघरी तिरंगा लावण्यात आला आहे. नागरिकांनी हर घर तिरंगा या मोहिमेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून कामाला सुरूवात केली आहे. या सरकारने पहिले प्राधान्य सर्वसामान्य, शेतकरी यांनी दिले. मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी निर्माण झाली. त्यावेळी आमच्या सरकारने तातडीने पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या. संबंधितांना निर्देश देण्यात आले असून वेगाने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

“मुसळधार पावसामुळे झालेल्या 28 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. तसेच यामध्ये 15 लाख हेक्टर जमिनीचे नुकसाना झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुमारे 15 हजार नागरिकांना सुरक्षास्थळी स्थलांतरीक करण्यात आले. या नागरिकांच्या मुलभूत गरजांची सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे”, असेही शिंदे यांनी म्हटले.

“अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून एनडीआरएफच्या मदतीपेक्षा प्रथमच सरकारने दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही मदत 2 हेक्टरपर्यंत मर्यादीत होती. त्यामध्ये वाढ करत 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. पूर आणि अतिवृष्टी यावर कायम उपाय करण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत नद्यांचे खोलीकरण करणे, गाळ काढणे यासाठी शास्त्रसुद्ध कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. ओबीसी समजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. राज्यातील जनतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे”, असेही शिंदे यांनी म्हटले.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिले ‘हे’ 5 संकल्प