घरमहाराष्ट्रपुणेबापट जाऊन तीनच दिवस झालेत, गुडघ्याला बाशिंग नको; पुणे पोटनिवडणुकीवरून पवारांचा संताप

बापट जाऊन तीनच दिवस झालेत, गुडघ्याला बाशिंग नको; पुणे पोटनिवडणुकीवरून पवारांचा संताप

Subscribe

पुणे – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येथे पोटनिवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या निधनास तीन दिवसही उलटत नाही तोवर येथील पोटनिवडणुकीच्या चर्चेला जोर आला आहे. यावरून विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने अजित पवारांनी त्यांना खडसावले आहे.

गिरीश बापट यांचे निधन झाले तेव्हा अजित पवार नाशिकमध्ये होते. त्यामुळे ते अंत्यविधीला येऊ शकले नाहीत. त्यामुळे आज अजित पवारांनी पुण्यात जाऊन बापट यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. पत्रकारांनी विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता पवारांनी वडेट्टीवारांना सुनावले. हे बघा, लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना हरवण्यासाठी अजित पवारांनी अनेकांना फोन केले होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता. याविषयी अजित पवारांना विचारले असता त्यांनी नरेश म्हस्के यांना ओळखत नसल्याचे म्हटलं.

जनतेला आवाहन

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर येथे रामनवमीच्या मध्यरात्री तुफान राडा झाला. दोन्ही गट एकमेकांत भिडले. तसंच, खासगी वाहनांसह पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. यामुळे तेथील वातावरण तापले आहे. तसंच, जळगावसह मुंबईतील मालाड मालवणी येथे दंगली घडत आहेत. असं असतानाच याप्रकरणी ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यता आले असून काहींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. या सर्व प्रकरणात सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवण्याचे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जनतेला आवाहन केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -