घरताज्या घडामोडीअयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत, जयंत पाटलांचा राज...

अयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत, जयंत पाटलांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर राजकीय वर्तुळात टोलवा टोलवी सुरुच आहे. अयोध्या दौऱ्यात यूपीतील मशिदींवरील भोंगे बंद आहेत का तपासावेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली असावी असे जयंत पाटील म्हणाले आहेत. राज ठाकरेंनी भाजपच्या हातातील बाहुले बनून करण्याची सुरुवात केली आहे अशी टीका पाटील यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन टोला लगावला आहे. राज ठाकरे अयोध्येला चालले आहेत. तिकडे कशाला जात आहेत माहिती नाही. दर्शनाला जात आहेत की, भोंगे वाजवायला जात आहेत. याबाबत मला माहिती नाही. राज ठाकरेंनी भाजपच्या हातातील बाहुले बनून काम करण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री योगींनी सुसज्ज व्यवस्था केली असल्याचे दिसत आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश तसेच भाजपशासित इतर राज्यात जाऊनही भोंगे सुरु आहेत का बघावे. तिथे भोंगे बंद केलेले नसतील तर महाराष्ट्रात तसा आग्रह धरण्याचा कुठलाही नैतिक अधिकार भाजपला राज ठाकरेंच्या मागे दडून आहे, असे मला वाटत नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

तसेच सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की, ठराविक डेसिबलच्या आत स्पीकरचा आवाज असेल तर त्याला परवानगी दिलेली आहे. भारतात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मशिदीवरील किंवा कुठल्याही ठिकाणच्या भोंग्यावर आवाज सुरु असेल तर त्याला कोर्टाची परवानगी आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

पक्षातले अनेक नेते देवधर्म करतात

राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंच्या टीकेनंतर मंदिरात जाताना दिसतायत असा प्रश्न जयंत पाटलांना करण्यात आला यावर ते म्हणाले की, आम्ही आमच्या घरात गणपती बसवतो, महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. आमच्या पक्षातले अनेक नेते देवधर्म करतात, त्यावेळी त्याचे प्रदर्शन होतेच. मात्र, आम्ही मतं मागायला लोकांपुढे जात असताना धर्माची भूमिका घेऊन जात नाही, हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे. आम्ही हिंदू आहोतच. कदाचित त्यांच्यापेक्षा आमच्या घरात जास्त कडक पद्धतीने हिंदू धर्म पाळला जात असेल. पण याचा अर्थ आम्ही आमचे हिंदुत्व घेऊन रस्त्यावर फिरावे आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष सुरु करावा, अशी आमची भूमिका नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : स्वच्छता कार्यात महाराष्ट्र आघाडीवर ठेवण्यासाठी सहकार्य करा, गुलाबराब पाटलांची विनंती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -