घरताज्या घडामोडीखरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा

Subscribe

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी पुकारली. बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तब्बल ३४ आमदारांना आणि अपक्ष ९ आमदारांनी सुरतहून आसाम गाठले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाळी पुकारली. बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तब्बल ३४ आमदारांना आणि अपक्ष ९ आमदारांनी सुरतहून आसाम गाठले. आसाममधील गुवाहटी येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ते मक्कामी आहेत. यावेळी बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली. परंतु, या सगळ्या राजकीय खेळात आता विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची तुलना करण्यास सुरूवात केली आहे. तसेच खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचेही ते म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असे त्यांनी म्हटले. (real shiv sena belongs to eknath shinde claims of ramdas athavale)

हेही वाचा – स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

- Advertisement -

विरोध पक्ष भाजपातील नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या दिवसापासून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच त्यांनी आता थेट खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचे म्हटले. “संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून त्यांना सेना-भाजपा युती तोडण्यास भाग पाडले. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हे सत्य आहे. यामुळे आता निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून जावे लागेल”, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा – संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

“एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जास्त आमदार असल्याने त्यांचीच खरी शिवसेना आहे. मी स्वतः देवेंद्र फडणवीस याना भेटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची विनंती करणार आहे. भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाल्यास रिपाइंला मंत्रिपद, महामंडळ, कमिट्या देण्याची मागणी करणार आहे. दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युतीमुळे गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांमध्ये खदखद होती. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३६ आमदारांनी बंड केले. राज्यात सत्तेत असतानाही सेनेच्या आमदारांची कामे होत नव्हती, त्यांना विश्वासात घेतले जात नव्हते. केवळ भाजपावर आरोप करून सत्ता राखण्याची महाविकास आघाडीची धडपड सुरू होती. म्हणूनच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.”, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा – वर्षा निवासस्थानावरील बैठकीत या आमदारांची उपस्थिती राहणार

”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आदिवासी महिलेस राष्ट्रपती निवडणुकीसाठी संधी देऊन अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. मुंबई महापालिकेतही यावेळी भाजप व मित्रपक्षांची सत्ता येणार आहे” असेही रामदास आठवले यांनी म्हटले.


हेही वाचा – स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -