घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरांना रोखण्यात यश येईल का?

कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडखोरांना रोखण्यात यश येईल का?

Subscribe

पुणे – कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला टक्कर देणाऱ्या महविकास आघाडीसमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बंडखोरांचा रुसवा दूर करण्यास यश येईल का हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – योग्य वेळी न्याय न मिळणं, हा अन्यायच!, संदीप देशपांडे असं का म्हणाले?

- Advertisement -

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबापेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, मंगळवारी शेवटची मुदत होती. काल कसबा पेठमध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब दभेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या राहुल कलाटे यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे.

या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जाची बुधवारी छाननी केली जाईल. पोटनिवडणुकीची अर्ज माघारीची मुदत १० फेब्रुवारी अशी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुढील दोन दिवसात बंडखोरांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील.

- Advertisement -

चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आधी राहुल कलाटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. आघाडीच्या बंडखोरांपैकी राहुल कलाटे यांनी चिंचवडमधून २०१९ ची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्या निवडणुकीत कलाटे यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. त्यावेळी कलाटे यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती. त्यामुळे कलाटे यांची बंडखोरी राष्ट्रवादीला अडचणीची ठरू शकते. दरम्यान, चिंचवडमध्ये बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून त्यांना अर्ज मागे घेण्याबाबत सांगण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -