घरमहाराष्ट्रकिरीट सोमय्यांचा दापोली पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या, घातपाताचा आरोप

किरीट सोमय्यांचा दापोली पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या, घातपाताचा आरोप

Subscribe

किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेत दापोली पोलीस अधीक्षकांनी स्टेशनमध्ये तासभर बसवून ठेवले होते. एफआयआर न नोंदवता काही काळानंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडण्यात आले.

दापोलीः भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपचे सरचिटणीस निलेश राणे हे दापोलीत दाखल झाले असून, त्यांनी दापोली पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस अधीक्षक आणि शिवसेना मिळून माझा घातपात करण्याचं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप केलाय.

किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना ताब्यात घेत दापोली पोलीस अधीक्षकांनी स्टेशनमध्ये तासभर बसवून ठेवले होते. एफआयआर न नोंदवता काही काळानंतर त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडण्यात आले. दापोली पोलीस स्टेशनच्या बाहेर येताच निलेश राणे आणि किरीट सोमय्यांनी पोलीस स्टेशन बाहेरच ठिय्या आंदोलन केलंय. त्यावेळीच त्यांनी दापोली पोलिसांवर घातपात करण्याचं कटकारस्थान रचल्याचा आरोप केलाय.

- Advertisement -

आमच्यासोबत जवळपास 200 वाहनं आणि कार्यकर्ते आले होते, पण फक्त चौघांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी इतर कार्यकर्त्यांना पोलीस कुठे तरी दूर घेऊन गेले. ते कार्यकर्ते आता कुठे आहेत, आम्हाला काहीही माहिती नाही. दापोलीच्या छोट्या गल्ल्यांत आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना ते शोधायला सांगत आहेत. दापोलीचा एसपी हा माफिया सेनेचा शाखा प्रमुख झाल्याची टीकाही किरीट सोमय्यांनी केलीय.

इथल्या पीआयला आम्ही एफआयआर नोंदवण्यास सांगितले. पण तरीही त्यांनी एफआयआर नोंदवून घेतलेला नाही. एफआयआर दाखल करून घेणं हा सामान्य नागरिकाचा अधिकार आहे. ठाकरे सरकारच्या दबावाखाली दापोली पोलीस काम करत आहेत. आधी म्हणाले ताब्यात घेतो, त्यानंतर जिल्ह्याच्या बाहेर सोडतो असे बोलले. दर पाच मिनिटाला पोलिसांची भूमिका बदलत आहे, असंही भाजप नेते निलेश राणेंनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचाः नोटीस स्वीकारतो पण सही करणार नाही; कशेडी घाटात सोमय्या-पोलीस आमनेसामने

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -