Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र कोल्हापुरातील घटना गृह खात्याचे अपयश; सुप्रिया सुळेंची टीका

कोल्हापुरातील घटना गृह खात्याचे अपयश; सुप्रिया सुळेंची टीका

Subscribe

कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये मंगळवारी (6 जून) तरुणांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे फोटो लावले होते. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. परंतु पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे कोल्हापुरमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आज पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. याप्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्या जे काही सुरू आहे हे गृह खात्याचे अपयश आहे. (Kolhapur Incident Failure of Home Department; Criticism of Supriya Sule)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जेव्हापासून भारतीय पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे, तेव्हापासून सारखंच असं वातावरण दुषित का होत आहे. काल नगरची घटना झाली आणि आज कोल्हापुरची घटना सुरू आहे. सारखंच तणावाचं वातावरण राज्यात कसं होत आहे. यामुळे राज्याचं नुकसान होणार आहे. कारण अशा गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर लोक गुंतवणूक करणार नाही. सर्वसामान्य जनता घाबरलेली आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे हे गृह खात्याचे अपयश आहे.

- Advertisement -

दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनमध्ये व्हॉट्सअप स्टेटसप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीन ते चार तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु हे सर्व तरूण अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण काही तासांसाठी शांत झाले. पण या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी रात्री बैठका घेतल्या आणि महाराष्ट्रात या घटना पुन्हा घडू नये, यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सकाळी (7 जून) 9.30 वाजल्यापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरूवात केली.

या घटनेनंतर कोल्हापूर शहरात जिल्हाबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण या आदेशांचे कोणतेही पालन न करता हिंदुत्ववादी संघटनांनी चौकात जमून आंदोलन करण्यास सुरूवात केली. आंदोलकांनी त्यांचा मोर्चा पुढे कुठेही न नेता आहे त्याच जागी आंदोलन करावे, अशी विनंती करण्यात आली होती. पण आंदोलकांनी हेही आदेश न पाळल्याने पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. हा जमलेला जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाल्यामुळे त्यांनी जमावावर लाठीचार्ज करण्यास सुरूवात केली. या सर्व घटनेमुळे शहरातील मटण मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून ते येत्या 19 जूनुपर्यंत कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -