घरमहाराष्ट्रशिंदे-फडणवीस सरकारमध्ये दंगलीच्या घटना घडणे हे त्यांचे अपयश, संजय राऊता आरोप

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दंगलीच्या घटना घडणे हे त्यांचे अपयश, संजय राऊता आरोप

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात घडत असलेल्या घटना या सरकारचे अपयश नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.

राज्यात पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण निर्माण झाले असून कोल्हापुरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरात जमावबंदीचे आदेश 19 जूनपर्यंत लागू करण्यात आले आहेत. पण या मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात घडत असलेल्या घटना या सरकारचे अपयश नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.

हेही वाचा – ‘योगायोग असू शकत नाही’; औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून उपमुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

- Advertisement -

यावेळी या प्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार जे स्वतःला हिंदुत्त्वावादी. कडवट हिंदुत्वादी आहे असे सांगतात. हे चालणार नाही, ते चालणार नाही. ते सहन करणार नाही, असे तुम्ही म्हणता. मग या सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले जातात. का तुमच्या सरकारचे हे अपयश नाही का? हे सर्व हे सरकारचं घडवून आणतंय अशी शंका यावेळी राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आली.

तर, अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांचे सरकार होते त्या काळात अशा घटना घडल्या नाही. त्याआधी भाजप-सेनेचे सरकार होते त्या काळातही अशा घटना घडल्या नाही. मग हे आत्ताच का घडत आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. कोल्हापूरमधल्या तरुणांचे स्टेट्स वादग्रस्त असल्याने त्यातून वाद निर्माण झाला. या राज्यात औरंगजेबाचे भक्त असतील तर त्यांनी देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी पाकिस्तानात जायचे. दरम्यान सरकारने देखील दोषींचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

औरंगजेबाइतका डॉ. कुरुलकर विषय गंभीर…

पुण्यात डॉ. कुरुलकर ज्याने पाकिस्तानला भारताची गुपितं विकली. तो आरएसएसचा प्रमुख कार्यकर्ता होता. त्याच्या विरोधातही मोर्चा काढायला हवा होता. औरंगजेबा इतकाच हा विषय गंभीर आहे. संघाचे काही लोकं पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशाची गुपिते विकली जातात. हनी ट्रॅपमध्ये सापडले जातात. हा विषय कोल्हापूर, नगरमध्ये औरंजेबाचा स्टेट्स ठेवण्या एवढाच गंभीर आहे. राज्यात शांतता राहावी, सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे, असे यावेळी संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

संभाजीनगरची लोकसभेची जागा ही शिवसेनेची…

संभाजीनगरची लोकसभेची जागा ही शिवसेनेची आहे. मात्र, गेल्यावेळी थोड्याश्या मताने आम्ही हरलो. आता यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू, पुन्हा ही जागा निवडून आणू. शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनता अजून आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बंड केलेल्या सर्व आमदारांच्या जागी आम्ही आमचे माणसे निवडूण आणू, असेही यावेळी संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले.

निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी…

उद्या निवडणुका झाल्या तर या सर्व जागा आम्ही खेचून आणू अशी जिद्द शिवसैनिकांनी केली आहे. अर्थात निवडणुका घेण्याची हिंमत या सरकारने दाखवायला हवी. हे सरकार निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. मग तुम्हाला कोणत्या जनमताचा पाठिंबा आहे? तुमचं सरकार कायदेशीर आहे. गतिमान आहे. मग निवडणुका होऊन जाऊ द्या ना? जनता कुणाच्या पाठी हेही दिसेल. खरं कोण खोटं कोण होऊन जाऊ द्या, असे आव्हानही संजय राऊत यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -