घरताज्या घडामोडीचुनाभट्टीत घरांवर दरड कोसळून तीनजण जखमी

चुनाभट्टीत घरांवर दरड कोसळून तीनजण जखमी

Subscribe

बचावकार्य सुरू असून तिघांना बाहेर काढण्यात आलं आहे, हे तिघेही जखमी असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुवाँधार पाऊस (Heavy Rainfall in mumbai) कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. चुनाभट्टीतही असाच अपघात झाला असून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवान्या झाल्या. बचावकार्य सुरू असून तिघांना बाहेर काढण्यात आलं आहे, हे तिघेही जखमी असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. (landslide in chunabhattti)

हेही वाचा – मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा

- Advertisement -

सततच्या पावसामुळे चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगर भाग कोसळला. डोंगराचा हा भाग लागून असलेल्या घरांवर कोसळल्याने दुर्घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. तिघांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशनम दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थली धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. दरम्यान, आता दरडीमुळे साठलेला मलबा बाजूला करण्याचं काम सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत १४.८० टक्के पाणीसाठा

मुंबईत मुसळधार पावसामुळे शहर व उपनगरात मिळून ११ ठिकाणी घरे, घराच्या भिंती, घराचा भाग कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये, विक्रोळी पार्कसाईट नजीक खंडोबाच्या टेकडीजवळ एका घरावर झाड व काही प्रमाणात दरडीचा भाग कोसळण्याची घटना सकाळी ८.३० वाजता घडली. त्यामुळे घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

शहर भागात – २ ठिकाणी, पूर्व उपनगरात – २ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ८ ठिकाणी अशा ११ ठिकाणी घरांची व घरांच्या भिंती यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. तसेच, मुंबईत शहर भागात – ४ ठिकाणी, पूर्व उपनगरात १ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – १ ठिकाणी अशा ६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत; मात्र या घटनात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘एनडीआरएफ’च्या ९, तर ‘एसडीआरएफ’च्या ४ टीम सज्ज

रात्रभर उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासूनचं मुंबईसह उपनगरांत दमदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचलं असून वाहतूकही संथ गतीनं सुरु आहे. अशातच कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचं मोठं नुकसान झालं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -