घरताज्या घडामोडीपळसेत बिबट्या जेरबंद

पळसेत बिबट्या जेरबंद

Subscribe

दारणा नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्यांची दहशत कायमच असून हल्ल्यानंतर या परिसरातून तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

पळसे शिवारातील गवंदे मळा परिसरातील संतोष रामदास गायधनी यांच्या मळ्यात लावलेल्या पिंज-यात मंगळवारी (दि.२१) पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. सकाळी नागरिकांनी पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडलेला दिसल्यानंतर नागरिकांनी पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती पोलीस पाटील सुनिल गायधनी यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे वन क्षेत्रपाल मधुकर गोसावी यांच्या पथकाने पिंजरा ताब्यात घेतला आहे. दरम्यान जेरबंद झालेला बिबट्या एक-दिड वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -