घरताज्या घडामोडीपेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाही, जाणून घ्या किंमत

पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतेही बदल नाही, जाणून घ्या किंमत

Subscribe

दिल्लीतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८०.४३ रुपये, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८१.६४ आहे.

महागाईशी झगडत असलेल्या जनतेला आज सरकारी तेल कंपन्यांचा दिलासा मिळाला आहे. आज देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता येथील पेट्रोल आणि डिझेलचे दर पूर्वीचेच आहेत.

आज दिल्लीतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८०.४३ रुपये आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८१.६४ रुपये आहे. आईओसीएलच्या वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार, कलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे ८२.१०, ८७.१९ आणि ८३.६३ रुपये आहे. तर डिझेलची किंमत अनुक्रमे ७६.७७, ७९.८३ आणि ७८.६० प्रतिलिटर आहे.

- Advertisement -

आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घ्या

तुम्ही पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, तुम्हाला आरएसपी (RSP) आणि तुमच्या शहराचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या नंबरवर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळा असतो. हा कोड तुम्हाला आईओसीएलच्या वेबसाईटवर मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत? यावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असतात. त्यानुसार दररोज किंमतीत बदल होत असतो.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा ८० हजार पार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -