Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या संभाव्य खात्यांची यादी जाहीर, पाहा एका क्लिकवर

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या संभाव्य खात्यांची यादी जाहीर, पाहा एका क्लिकवर

Subscribe

भाजपकडे गृह, महसूल, वित्त आणि नियोजन, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन ही खाती राहू शकतील, असाही कयास बांधला जातोय. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांच्या खातेवाटपाचीही संभाव्य यादी माय महानगरच्या हाती लागली आहे

मुंबईः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 39 दिवसांनी मंगळवारी महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार दोन्ही बाजूंनी 9-9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. सर्वप्रथम भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे प्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्रिपद स्वतः शिंदे यांच्याकडे असल्याने वजनदार खाती भाजपकडे राहणार हे निश्चित असून, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांना कोणती खाती मिळणार याबाबत चर्चा रंगली आहे.

शिंदे गटाकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, विधी आणि न्याय, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), कृषी, उद्योग, परिवहन, मराठी भाषा विकास, वने आणि पर्यावरण, पर्यटन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, रोहयो, फलोत्पादन, जलसंधारण, उच्च आणि तंत्रशिक्षण, ही खाती राहण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे गृह, महसूल, वित्त आणि नियोजन, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन ही खाती राहू शकतील, असाही कयास बांधला जातोय. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांच्या खातेवाटपाचीही संभाव्य यादी माय महानगरच्या हाती लागली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) खाती राहणार असल्याचं सांगितलं आहे. तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे अर्थ आणि गृह खाते सोपवले जाणार आहे.

1) राधाकृष्ण विखे पाटील, भाजप, महसूल, सहकार

- Advertisement -

2) सुधीर मुनगंटीवार, भाजप, ऊर्जा व वन

3) चंद्रकांत दादा पाटील, भाजप, सा.बा.

4) विजयकुमार गावित, भाजप, आदिवासी

5) गिरीश महाजन, भाजप, जलसंपदा

6) गुलाबराव पाटील, शिवसेना, पाणी पुरवठा

7) दादासाहेब भुसे, शिवसेना, कृषी

8) संजय राठोड, शिवसेना, ग्राम विकास

9) सुरेश खाडे, भाजप, सामाजिक न्याय

10) संदिपान भुमरे, शिवसेना, रोजगार हमी

11) उदय सामंत, शिवसेना, उद्योग

12) तानाजी सावंत, शिवसेना, उ.व तं. शि

13) रवींद्र चव्हाण, भाजप, गृह निर्माण

14) अब्दुल सत्तार, शिवसेना, अल्पसंख्य विभाग

15) दीपक केसरकर, शिवसेना, पर्यटन व पर्यावरण

16) अतुल सावे, भाजप, आरोग्य विभाग

17) शंभूराजे देसाई, शिवसेना, राज्य उत्पादन शुल्क

18) मंगल प्रभात लोढा, भाजप, विधी व न्याय


हेही वाचाः आता मंत्र्यांच्या खातेवाटपाची उत्सुकता; वजनदार खाती भाजपकडे राहणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -